स्पर्धेत सहभागी व्हा, रक्त पुरवठ्यात योगदान द्या

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गणेश मंडळांसाठी अभिनव स्पर्धा ,संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री प डाऊनलोड करा,

यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक उत्साहाबरोबरच समाजसेवेची अनोखी जोड मिळणार आहे. गणेश मंडळांसाठी ‘संजिवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ डाउनलोड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गणेशभक्तांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून, रक्तदानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.

 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक गणेश मंडळांनी आयोजकांकडे फोनवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी. मंडळाच्या सदस्यांनी ‘संजिवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ हे गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे, आणि त्यानंतर एका गुगल फॉर्मद्वारे नाव, मोबाईल क्रमांक आणि मंडळाचा कोड भरायचा आहे. सर्वाधिक डाउनलोड करणाऱ्या ५ गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

 या उपक्रमामुळे रक्तदात्यांची उपलब्धता वाढेल, समाजामध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि अनेक रुग्णांचे प्राण वाचतील. गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची अनोखी अशी किनार प्राप्त होईल,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 वोक्हार्ट फाऊंडेशनतर्फे असे नमूद करण्यात आले की, “लोकमान्य टिळकांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची परंपरा आहे. त्याच बांधिलकीचा भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना म्हणूनच आवाहन करण्यात आले आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवावा. त्यातून लाखो लोकांचा जीव वाचणार आहे. या उपक्रमाचा नीट प्रसार व्हावा म्हणूनच त्याला स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे.”

वोक्हार्ट फाऊंडेशनच्या संकल्पनेतून तयार झालेले हे अॅप संपूर्णतः मोफत आहे. या अॅपमुळे आपत्कालीन परिस्थितीत रक्तपेढ्यांना एका क्लिकवर नोंदणीकृत रक्तदात्यांशी संपर्क साधता येतो. रक्तदात्यांना नोटिफिकेशन मिळते आणि उपलब्धतेनुसार ते तात्काळ रक्तदान करू शकतात. त्यामुळे गरजेच्या वेळी मदत करण्याचं समाधान रक्तदात्यांनाही लाभते.ई-मेल व मोबाईल तपासणीमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह राहणार असून, या स्पर्धेमुळे मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील आणि खऱ्या अर्थाने ‘संजिवनी’ जीवनदायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.