पैलवान गंँग… गेली जिल्ह्याबाहेर… असे काय घडल… पाेलिसांनी काय केले वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पेठवडगांव परिसरातील “पैलवान गँग” टोळीवर पोलिसांची करडी कारवाई!

कोल्हापूर : जिल्ह्यातील सामाजिक हितास धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून सातत्याने एमपीडीए तसेच हद्दपारीची कडक कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने पेठवडगांव परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात “पैलवान गँग” टोळीला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टाेळीवर 3 खुनाचा प्रयत्न, खंडणी मारामारी,शासकीय कामात अडथळा, गर्दी, मारामारी, किडनॅपिंग, जुगार, दारू फसवणूक असे 27 गुन्हे दाखल आहेत.

हातकणंगले तालुक्यात तसेच जिल्ह्याच्या परिसरात अवैध गुन्ह्यांना खतपाणी घालणाऱ्या या संघटित टोळीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. या टोळीचा प्रमुख प्रविण बावु माने (३०) याच्यासह अजिंक्य उर्फ अक्षय अशोक माने (३७), विशाल विनायक माने (२९), विश्वजीत अशोक माने (२२), दिपक वसंत माने (४१), धनाजी शंकर माने (३३), अजित वसंत माने (३७), सागर राजेंद्र खोत (२१), अमर उर्फ राहित सुरेश वडर (२५) आणि सुरज नेताजी जाधव (३३) या दहा जणांचा समावेश आहे.

निर्जनस्थळी वृद्धांना मारहाण…LCB चा धडाका, टाेळी जेरबंद… मुद्देमाल जप्त

वडगांव पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुसार चौकशी अधिकार्‍यांनी सखोल तपास करून अहवाल सादर केला. सुनावणी दरम्यान टोळी प्रमुख व सदस्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सामाजीक स्वास्थ व शांतता धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

या पार्श्वभूमीवर टोळीचा वाढता गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम बसावा, सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांचे हित जपावे म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी या दहा जणांना हद्दपार करण्याचे आदेश कडकपणे बजावण्यात आले आहेत.दरम्यान, हद्दपार केलेले टोळी सदस्य कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही आढळल्यास नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३१-२६६२३३३ या दूरध्वनीवर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.