शिंपी समाजाकडून संत नामदेव महाराजांचे पंढरपुरातील स्मारकाचा प्रश्न व अनेक समूह मागणी…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिंपी समाज बांधव व नामदेव शिंपी समाज युवक संघ संघाकडून मागणी शासन स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले संतोष केदार यांचा सन्मान…

पुणे – शनिवार २ मार्च रोजी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशची नियोजित बैठक पार पडली. या बैठकीस अनेक समाजाचे प्रतिनिधी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू समन्वयक सहायक योगेश केदार उपस्थित होते. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची अनेक समाजाच्या प्रतिनिधींना घेऊन बैठक घालून दिली होती. यात अनेक समाजाच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या.

यावेळी संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील स्मारकाचा प्रश्न ही मांडण्यात आला होता. यासह बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्याची ग्वाही दिली असून प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले स्मारक, बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजना म्हणून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था, तेर- ढोकी येथील संत गोरोबा काका समाधीस्थळास ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा, संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारकाच्या तसेच कोविड काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक विवंचनेतून नाभिक समाजातील काही व्यक्तिंनी आत्महत्या केली होती, अशांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अशा मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणारे योगेश केदार यांचा शिंपी समाजातर्फे श्रीफळ, शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी यांचेसह शिंपी समाजातील ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी सुभाषजी मुळे, नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेशजी हिरवे, राजगुरुनगर नामदेव शिंपी समाज अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोरजी कुमठेकर, लोकशाही संघर्षचे अतुल नांगरे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष रणजित माळवदे, पुणे जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ कसबा पेठ या संस्थेचे विश्वस्त राहुल सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.