आजच वेळ राखून ठेवा… सलग आठ तास तबला वादनाचा विश्वविक्रम हाेणार कोल्हापूरात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर :

सलग आठ तास तबला वादनाचा विश्वविक्रम कोल्हापूरात

कोल्हापूर :
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कुमार गोविंद बाबुराव गवाडे (इयत्ता बारावी, सायन्स) सलग आठ तास तबला वादनाचा विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे.

हा ऐतिहासिक प्रयत्न रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. ठिकाण — डॉक्टर बापुजी साळुंखे स्मृती भवन, विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे हाेणार आहे. 

समारंभात ग्लाेबल बुक ऑफ रेकॉर्ड् व एशियन पँसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड्स नोंद घेणार आहेत.

कार्यक्रमाला माजी शिक्षण व गृहनिर्माण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष बबनराव पाटील, माजी विकास मंत्री उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील अधिकारीही उपस्थित राहतील. विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तरी हा विश्वविक्रम पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.    

307

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.