पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
चिपळूण (प्रतिनिधी): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मागासवर्गीय सेलचे चिपळूण तालुकाध्यक्ष युवा नेते विशाल जानवलकर यांचा रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण आणि खेंड कोलेखाजन चिपळूणकर वाडीतर्फे नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.
चिपळूण रोहिदास समाजसेवा संघाच्या वार्षिक सभेत आमदार शेखर निकम यांनी सन्मानचिन्ह देऊन विशाल जानवलकर यांचा गौरव केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर खेंड कोल्हेखाजण चिपळूणकर वाडीतर्फे मंगेश चिपळूणकर, नरेश चिपळूणकर,राकेश चिपळूणकर, नागेश बोंडकर, रमेश कादवडकर यांनी जानवलकर यांच्या निवासस्थानी जावून त्यांना गौरविले. यावेळी राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष उदय ओतारी हेही उपस्थित होते. या सत्काराबद्दल जानवलकर यांनी समाज आणि ज्ञाती बांधवांचे आभार मानले असून समाजसेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.