मंदीराचे सुशोभिकरण करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी…
गारगोटी प्रतिनिधी – महाराष्ट्र देशातील अनेक राज्यांचे श्रध्दास्थान असलेल्या संत बाळुमामा यांचे गुरू श्री सदगुरू मुळे महाराज यांचे गारगोटी (ता.भुदरगड) येथे असणाऱ्या समाधीजवळ बांधण्यात येणाऱ्या मंदीराचे सुशोभिकरण करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा शुभारंभ आज रविवार 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.
भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे असणाऱ्या संत बाळुमामा मंदीरामध्ये महाराष्ट्रासह परराज्यातील भावीक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. संत बाळूमामा यांचे गुरूवर्य असलेले सदगुरू मुळे महाराज यांची गारगोटी शहरातील दत्त मंदीर मंदीर नदी घाटाशेजारी समाधी आहे. बाळुमामांच्या दर्शनानंतर असंख्य भावीक बाळूमामांचे गुरु असलेल्या सदगुरू मुळे महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात.
यामुळे येणाऱ्या भावीकांना चांगल्या प्रकारच्या सेवा-सुविधा मिळाव्यात याकरीता या मंदीराची समिती मधील अंकुश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, माजी सरपंच नामदेव शिंदे, दत्तात्रय कुरळे, एम.डी.पावले, धनाजी गुंड, विश्वनाथ घाटगे, लाला बोटे, हेमंत देसाई, सुनिल भराडे, नंदकुमार चव्हाण, तुकाराम देसाई, अमर चौगले, नामदेव चौगले यांच्यासह अनेक भावीक प्रयत्त करत होते. त्यांच्या प्रयत्नातून मंदीराचे काम देखील सुरु आहे. येथे येणाऱ्या भावीकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.