GOOD NEWS मुथूट फिनकॉर्प शाखेचा बांबवडे येथे दिमाखात ओपनिंग… ग्राहकांना अधिकाधिक सेवा देणार

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
शाहूवाडी :बांबवडे ता. शाहुवाडी येथे मुथूट फिनकॉर्प लिमिटेड या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा समारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे पैलवान यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी झोनल हेड प्रसन्न कुमार बीजी, एरिया मॅनेजर सोनिया काटकर, शाखा मॅनेजर संग्राम कांबळे प्रमुख उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी पैलवान विजय बोरगे म्हणाले की संपूर्ण भारतात जवळपास 3500 च्या वर फिनकॉर्प लिमिटेडच्या शाखा कार्यरत आहेत. आता ग्रामीण भागात देखील चांगली सेवा देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांची सेवा पाेहाेचले. नवीन शाखेमध्ये गोल्ड लोन, लघु उद्योग लोन, दुचाकी वाहन कर्ज, ग्रह निर्माण कर्ज, विमा, म्युच्युअल फंड, परकीय चलन, भिशी, सुलभ हप्त्यावर सोने खरेदी, दुचाकी कर्जावर महिलासाठी विशेष योजना आदी सुविधांची माहिती यावेळी मुथूट फिनकॉर्प लिमिटेड च्या वतीने देण्यात आली. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देणे हेच या शाखेचे उद्दिष्ट आहे असे मुथुट फिनकाँर्प लिमिटेडच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. 

शाखेच्या उद्घाटन समारंभावेळी बांबवडेचे सरपंच भगतसिंह चौगुले, उपसरपंच स्वप्निल घोडे पाटील, सदस्य सुरेश नारकर, मेडिकल असोसिएशनचे प्रताप खुटाळे ,उद्योगपती रोहन फाटक, गोगवे ग्रा.प सदस्य सागर माने, किशोर माने, सुवर्णा दाभोळकर, संजय पाटील,आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
VIDEO  पाहण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करा…—https://youtu.be/HjPK_3eOHoU?si=QfkLhP0g53UhvoDN

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.