मातृसंस्था असणाऱ्या बिद्री कारखान्यात भ्रष्टाचार करणाऱ्या लै भारी चेअरमनांना धडा शिकवा – आ. प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

नतरवडे येथील कॉर्नर सभेत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित ए. वाय. पाटील, विठ्ठलराव खोराटे, अरुण जाधव, संदीप मगदूम, एकनाथ पाटील आदी मान्यवर..

सरवडे प्रतिनिधी – राधानगरी, कागल, भुदरगड व करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असणाऱ्या बिद्री सहकारी साखर करखान्यामध्ये लै भारी चेअरमनांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. तसेच त्यांनी चुकीच्या पध्तीतीने कामकाज करून शेतकऱ्यांची देखील फसवणूक केली असून लै भारी चेअरमनांना धडा शिकवा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते नरतवडे, ता.राधानगरी येथील राजर्षी शाहु शेतकरी विकास परिवर्तन आघाडीच्या प्रचार सभेवेळे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रंगराव मगदूम होते.

यावेळी बोलतना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, स्वत:च्या फायद्यासाठी लै भारी चेअरमनांनी काखान्यामध्ये परमनंट नोकर भरती केलेली नाही. त्याउलट कारखान्यामध्ये दरवर्षी शेकडो कर्मचारी चिट्टीवर घेतले जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मागील 5 वर्षामध्ये 13 ते 14 कोटी रुपयांची खंडीत बिले खर्ची टाकली आहेत. तसेच त्यांनी सहजीव प्रकल्पामध्ये गेल्या 5 वर्षात 96 कोटी रुपयांचा नफा दाखवून 96 कोटी रुपयांचा तोटा दाखवून मोठी अफरातफर केली आहे. तसेच कारखाना प्रशासनाकडून मोलॅसिस विक्री करतेवेळी जिल्ह्यातील इतर सहकारी साखर करखान्यापेक्षा 500 ते 1000 रुपयांपर्यंत किती किंमतीने विक्री करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान त्यांनी केले आहे. कारखाना प्रशासनाकडून अनावश्यक पध्दतीने लाखो रुपयांची साहित्य खरेदी केलेली असून याबाबत लेखापरिक्षणामध्ये नोंद नाही तसेच स्कॅप विक्री विक्रीबाबत ही लेखापरिक्षणामध्ये नोंद न करता यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. एखाद्या दुध संस्थेला वर्षाला 3 ते 4 लाख रुपये नफा होते परंतू लै भारी चेअरमनांनी भ्रष्टाचार लपविण्यासाठी कोटवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या कारखान्यामध्ये 2 ते 3 लाखांचा नफा दाखवून शेतकऱ्यांची व सभासदांची चेष्टा करण्याचे काम केले आहे. आम्ही कारखान्यामध्ये के.पी.पाटील यांनी केलेल्या चुकीच्या पध्दतीच्या कामकाजा विरोधात चाचणी लेखापरिक्षण करण्याची मागणी केली आहे. यामध्ये नमूद बाबींची स्पष्टता आल्यानंतर सभासद शेतकऱ्यांना खरी वस्तूस्थिती काय आहे हे समजून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वाभिमानी नरतवडेकरांचा अपमान करणाऱ्यांची उतरती कळा सुरु…
राधानगरी तालुक्यातील नरतवडे हे गाव सुज्ञ सभासद व चांगल युवकवर्ग असलेले शेतीमध्ये अत्याधुनिक पध्दतींचा वापर करणारे वडीलधाऱ्या मंडळींचे नेतृत्व मानून काम करणारे गाव आहे. चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे राहणे ही नरतवडे करांची खासीयत असून स्वाभिमानी नरतवडेकरांचा अपमान करणाऱ्यांची जागा त्यांना या निवडणूकीमध्ये दाखवून द्यावे असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

यावेळी बोलताना ए. वाय. पाटील म्हणाले की, बिद्री कारखान्याची निवडणूक आली की त्याचवर्षी के. पी. पाटील ऊसाला जादा दर देतात आणि ऊस विकासाचे कार्यक्रम राबवितात. परंतु निवडणूक झाली की पुढील वर्षांत ना ऊसाला जादा दर दिला जातो ना ऊस विकास कार्यक्रम राबविला जातो. त्यांचा हा फसवेगिरीचा फंडा सुज्ञ सभासदांना कळला असून केवळ निवडणूकी पुरती आश्वासनाची खैरात करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील. त्यामुळे बिद्रीत परिवर्तन अटळ आहे असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील म्हणाले. स्वताची शिक्षणसंस्था नावरूपास येण्यासाठी कारखान्यावर असणाऱ्या शिक्षणसंस्थेकडे दुर्लक्ष करण्याचे काम के.पी.पाटील यांनी केले आहे. बिद्रीच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत स्वरुपाची शिक्षणसंस्था उभारता आली असती परंतु स्वताची मुदाळची संस्था चालविण्यासाठी त्यांनी या कारखान्याच्या शिक्षणसंस्थेकडे डोळे झाक केली.

यावेळी एस. ए. पाटील यांनी स्वागत केले, संग्राम कदम यांनी प्रास्ताविक केले. आनंदा पाटील यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, अरुण जाधव, व्ही. टी. येरुडकर, दत्ता कदम यांची भाषणे झाली. संदीप मगदूम, नेताजी पाटील, प्रभाकर पाटील, भिकाजी हळदकर, युवराज वारके, सुभाष पाटील, एकनाथ पाटील, भगवान पातले, वाय डी पाटील, शिवाजी चौगुले, विजय बलुगडे, अशोक फराकटे, आनंदा पाटील, डी. पी. पाटील, बी. एस. पाटील, आर. वाय. पाटील, बाळासाहेब पाटील, सिताराम खाडे, राजाराम साठे, कुंडलिक पाटील, अरविंद पाटील, नाना पाटील, शिवानंद महाजन, अवीनाश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर सभासद उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.