आश्चर्य : 4 मिनिट 22 सेकंदात काय घडले… फटाक्यांची आतषबाजी, नि मिरवणूक : वाचा सविस्तर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा स्वयंम पास्ते प्रथम क्रमांकाने विजयी…

कोल्हापूर – सहा मिनिटांमध्ये शंभर गणित सोडवण्याच्या स्पर्धेमध्ये मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी कु.स्वयंम पास्ते याने आपल्या कॅटेगिरी मध्ये चार मिनिट बावीस सेकंदामध्ये 100 पैकी 99 गुण मिळवून प्रथम क्रमांकाने विजेता झाला.

या स्पर्धेमध्ये पाच राज्यांमधील 38 जिल्हे, 232 तालुक्यातील 420 सेंटर यामधून 2530 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सहभाग नोंदवला होता. प्रथम विजेत्या स्पर्धकांला सायकल व मानाची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

स्वयम हा इयत्ता तिसरीमध्ये शिकत असून त्याने कमी वयामध्ये मिळवलेले यश यामुळे समाज वर्गामध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे. त्याला शाळेचे अबॅकस शिक्षक प्रणाली आमते मॅम व धनराज आमते सर शाळेचे संस्थापक शिवाजी घुरके सर व मुख्याध्यापिका चौगुले मॅडम यांचे तस्च आई-वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.