सेवा, दर्जा, परवडणारी किंमत यामुळे गो गॅस लीडिंग कंपनी होणार – प्रा. तोहीद मुजावर
सांगली (प्रतिनिधी) – कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड (CPIL) या कंपनीच्या गो गॅस एजन्सीचे ऑफिस व गोडाऊनचे उद्घाटन प्रा. तोहीद मुजावर यांच्या हस्ते फित कापून, तर सांगली अर्बन बँकेचे माजी संचालक रमेश (अण्णा) चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
सुधाकर गोल्ड स्मिथचे मालक सुधाकर नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थित ऐश्वर्या ट्रेडिंग कंपनीच्या नावाने अधिकृत गो गॅस एजन्सीचे प्रोप्रायटर संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण मळा, वैभव हॉटेल शेजारी, भोसले गार्डन समोर, पदमाळे फाटा, सांगली येथे हा कार्यक्रम पार पडला.
प्रा. तोहीद मुजावर म्हणाले की, संतोष पाटील यांना समाजासाठी धडपडताना अनेक वर्षे पाहत आलो आहे. यश-अपयश न पाहता ते नेहमी समाजासाठी कार्यरत असतात. गो गॅस एजन्सीच्या उद्घाटनासाठी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सेवा, दर्जा आणि सर्वसामान्यांना परवडणारी किंमत यामुळे भविष्यात गो गॅस ही लीडिंग कंपनी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश चव्हाण यांनी सांगितले की, संतोष पाटील यांचा उत्साह आणि चिकाटी पाहून त्यांनी स्वतःचे गोडाऊन आणि ऑफिस त्यांच्या गॅस एजन्सीसाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे व्यवसायात चांगली भर पडेल आणि त्यांनी उत्कृष्ट सेवा देऊन व्यवसाय वृद्धिंगत करावा, अशा शुभेच्छा दिल्या.
सराफ व्यवसायिक सुधाकर नार्वेकर म्हणाले की, संतोष पाटील हे आमचे जवळचे मित्र आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. त्यांनी समाजासाठी नेहमीच काहीतरी चांगले केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत मालवणकर यांनी सांगितले की, गो गॅस ही एजन्सी सांगलीमध्ये नवीन असून, आम्ही त्यांचे मार्केटिंग करण्यास मदत करू. दर्जा, सेवा आणि कमी किंमतीमुळे गो गॅस सर्वांनी वापरावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रा. नंदकुमार सुर्वे, विजय देसाई, गजानन पोतदार, रमेश कारंडे, विनायक विभुते, शरीफ भाई, अनिल माने, अनमोल पाटील, स्वप्निल शेटे, सुशांत कदम, अरविंद ठोंबरे, प्रणव शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी, संतोष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.