विनायक जितकर
विभागीय सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांचेकडे लेखी निेवेदन देताना बाबा नांदेकर, विजयराव बलुगडे.
गारगोटी – श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. सद्यस्थितीमध्ये कार्यरत असणारे विद्यमान काळजीवाहू संचालक मंडळाच्या प्रशासकीय कामांमध्ये राजकीय हेतूने हस्तक्षेप होऊ शकतो. यामुळे बिद्री साखर कारखान्याच्या काळजीवाहू संचालक मंडळाचा प्रशासकीय कामकाजामधील हस्तक्षेप थांबविण्याची मागणी बिद्री बचाव कृती समितीच्या वतीने विभागीय सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली. आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या सहकारी संस्थेची निवडणूक कार्यक्रम सुरू असताना त्या संस्थेच्या संचालक मंडळाला प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजामध्ये कोणताही निर्णय घेता येत नाही. तरीसुद्धा बिद्री कारखान्यामध्ये सध्या कार्यरत असणारे काळजीवाहू संचालक मंडळ जाणीवपूर्वक प्रशासनाचा उपयोग करून मतदारांना प्रलोभन दाखवणारा निर्णय घेऊ शकतात. यामुळे निवडणुकीची आचारसंहिता भंग होवू शकते.
यामुळे श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू असून काळजीवाहू असलेल्या संचालक मंडळाचा प्रशासकीय कामकाजामधील सुरू असलेले हस्तक्षेप थांबवा असे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे, बाबा नांदेकर, विजयराव बलुगडे आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.