कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर राज्यस्तरीय युद्धकला प्रात्यक्षिके…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धकलेच्या बळावरच हिंदवी स्वराज्य स्थापन केले…राज्यभरातील ७०० खेळाडूंचा सहभाग…

कोल्हापूर – भारतीय युद्धकलांचे संपूर्ण जगाला प्रचंड आकर्षण आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. खेळाडूंनी सादर केलेल्या तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह इतर युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थित रोमांचित झाले.

कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर राज्यस्तरीय युद्ध कला प्रात्यक्षिके स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मुश्रीफ बोलत होते. या राज्यस्तरीय युद्ध कला प्रात्यक्षिकांच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील खेळाडूंनी प्राचीन युद्ध कलांचा थरार सादर केला. या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील ५० संघ व ७०० खेळाडू सहभागी झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध कलेच्या बळावरच गडकोट जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही सर्वजणही युद्ध कला प्राणपणाने जपत आहात याचा अभिमान वाटतो. यामुळे प्राचीन युद्ध कला जपण्याबरोबरच शरीरयष्टी व आरोग्यही उत्तम राहील.

पालकमंत्र्यांची लाठीकाठी……!
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित स्पर्धक खेळाडू विविध युद्धकलांची प्रात्यक्षिके सादर करीत होते. हलगी कैताळाच्या गजरात वातावरणही जल्लोषी बनले होते. अशातच मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पुढे सरसावत एका खेळाडूकडील लाठी घेतली आणि हलगीच्या गजरात मोठ्या उत्साहात लाठी चालविली. त्यानंतर त्यांनी केलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज की जय….” या जयघोषाने वातावरण दुमदुमले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ज्येष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे, पंडितराव पोवार, बाबासाहेब पोवार, बाळासाहेब शिकलगार, सदानंद सूर्यवंशी, भिकाजी पाटील, नानासाहेब सावंत, सदानंद नलवडे-कराड, तानाजी भोईटे, सुखदेव गिरी, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, उदय गायकवाड, आनंद काळे, ऋषिकेश केसरकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उप शहर अभियंता नारायण भोसले, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.