टेंबलाइवाडी शाळेच्या शुभ्राचा ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद’मध्ये राज्यातून गौरव
कोल्हापूर राजेश वाघमारे : टेंबलाइवाडी विद्यालय, शाळा क्रमांक ३३ येथील विद्यार्थिनी शुभ्रा सचिन खाडे हिने स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद’ मध्ये महाराष्ट्रातून निवड होऊन शाळेचे व कोल्हापूरचे नाव उज्वल केले आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात हजारो स्पर्धकांमधून निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
सततची मेहनत, सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शुभ्राने ही संधी मिळवली आहे. तिच्या गायन प्रवासात मार्गदर्शक प्रभाकर लोखंडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शाळेचे मुख्याध्यापक विलास पिंगळे सर यांची प्रेरणा व शिक्षकवृंदाचे सहकार्य तिला सातत्याने मिळाले.या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही कला, संगीत व सृजनशील क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.शुभ्राच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व विद्यार्थी व पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



















































