न्यू मॉडेलच्या यश भागवतची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड.
***************************
कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व कोल्हापूर महानगरपालिका याच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ वर्षातील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कु. यश आशिष भागवत.
(Xii-Sci)यांनी तृतीय क्रमांक मिळविला त्याची जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या वतीने सातारा येथे दिनांक २७ ऑक्टोबर २५ .रोजी होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे. संस्था सचिवा प्राचार्या .सौ. शुभांगी मुरलीधर गावडे. सी.ई.ओ. श्री कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.
यशला सर्व गुरुदेव कार्यकर्ते व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम यांचे प्रोत्साहन लाभत आहे.