मुदाळतिट्टा येथील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जलद गतीने उड्डाणपुल बांधा – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

आमदार प्रकाश आबिटकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी…

बिद्री – कोल्हापूर जिल्हयातील गारगोटी – कोल्हापूर व राधानगरी – निपाणी या राज्यमार्गावरील मुदाळ तिटटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरीकांचे हात होत असून मुदाळतिट्टा येथे उड्डाणपुल बांधणेसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

मुदाळतिट्टा हे राधानगरी, भुदरगड व कागल या तिन्ही तालुक्यांचे मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. या ठिकाणापासून १ किमी अंतरावर आदमापूर हे सदगुरु बाळूमामा यांचे देवस्थान असून दोन राज्यमार्गाचे मध्यभागी हे ठिकाण आहे. या बरोबरच मोठी व्यापरपेठ, सहकारी साखर कारखाना, शैक्षणिक संस्था याच परिसरामध्ये असल्यामुळे सदर ठिकाणी नियमित वाहनांची वर्दळ असते. सदगुरु बाळूमामा मंदीर येथे दर रविवारी मोठ्या प्रमाणात भावीक येत असून आमवस्याला यात्रा भरते. या यात्रेत राज्यासह परराज्यातून भक्तगण येत असतात. तसेच पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन येणारी अवजड वहाने निपाणी – मुदाळ तिटटा-राधानगरी मार्गे कोकणात जातात त्यामुळे मोटी अवजड वाहने येथे दैनंदिन येत असतात.

गारगोटी – कोल्हापूर हा अत्यंत रहदारी असणारा मार्ग असल्यामुळे मोठया प्रमाणात दळण-वळण या मार्गे सुरु असते. परिणामी येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन २ ते ३ तासांची व यात्रेवेळी ५ ते ६ तासांपर्यंत वाहतूक कोंडी होत असते यामुळे प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत असून अत्यावश्यक प्रसंगी एखादी रुग्णवाहीका देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत.

भविष्यात कोल्हापूर-गारगोटी मार्गे गोव्याकडे जाण्यासाठी मार्ग होणार असून मोठ्या प्रमाणात वाहने वाढणार आहेत. यामुळे मुदाळतिट्टा येथे उड्डानपुल होणेची मागणी येथील नागरीकांकडून होत असून याठिकाणी उड्डाणपूल बांधणेसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे आमदार आबिटकर यांनी केली  आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.