३५ वर्षांची निष्ठा आणि नेतृत्व : चौधरी सरांचा मानाचा सत्कार
*अभिनव नेतृत्वाचा गौरव : एस. के. चौधरी सरांचा मानाचा सत्कार*
*नाशिक:* म. वि. प्र. आयटीआयमध्ये दीर्घकाळ समूह संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या श्री. एस. के. चौधरी सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त, नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्था मर्यादित, जि. नाशिक तर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. १९ मार्च १९९१ पासून म्हणजे गेली जवळपास ३५ वर्षे सुरक्षित व विश्वासार्ह आर्थिक सेवा देणे हे प्रमुख ध्येय घेऊन नाशिक जिल्ह्यातील कॉलेज टीचर्ससाठी ही सहकारी सोसायटीचे कार्यरत असून २०६२ सभासद आहेत.
या विशेष सोहळ्यात सोसायटीचे चेअरमन व प्राचार्य डॉ. महेश वाघ यांनी चौधरी सरांच्या संस्थेवरील योगदानाचे मनापासून कौतुक केले. यावेळी कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब पाटील, प्रा. निरंजन जाधव आणि प्रा. किरणकुमार जोहरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चौधरी सरांनी संस्थेमध्ये अनेक अभिनव बदल, परिणामकारक प्रशासनशैली आणि शिस्तबद्ध कार्यसंस्कृती रुजवली. त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्था मर्यादित, जि. नाशिक तर्फे कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना गौरवण्यात आले आहे.





















































