उद्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा सोशल सैनिकांचा निर्धार…
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवसेना सोशल मिडिया विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आज शिवसेना कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत उद्या कोल्हापूर येथे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होतं असलेला मेळावा यशस्वी करण्यासाठी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान श्री. सौरभ कुलकर्णी (सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र उपविभागीय समन्वयक) यांनी भूषवले.
बैठकीत नागेश जोंदाळ यांची कोल्हापूर सरचिटणीस, अभिषेक हेटकाळे यांची कोल्हापूर दक्षिण समन्वयक, तर वृषाली सुतार यांची महिला आघाडी कोल्हापूर उपशहरप्रमुख पदी निवड केल्याचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांच्या हस्ते देण्यात आले. बैठकीत आगामी काळातील सोशल मिडिया रणनीती, संघटनात्मक बळकटी, प्रचारमोहीम, तसेच डिजिटल माध्यमांद्वारे पक्षविचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेनेच्या कार्याचा प्रसार, जनतेशी थेट संवाद साधणे आणि युवकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून पक्षाशी जोडणे या उद्दिष्टांसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरले.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल क्षेत्रातही शिवसेनेची ताकद अधिक प्रभावीपणे दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी जिल्ह्यातील सोशल मिडिया कोल्हापूर जिल्हाप्रमुख जयवंत बरगे, लोकसभाप्रमुख संग्रामसिंह पाटील, उपजिल्हाप्रमुख अमोल नवले,कोल्हापूर शहर समन्वयक स्वराज पाटील, राधानगरी विधानसभा प्रमुख विनायक जितकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












































