शिरपूर वरवाडे न. प. शाळांचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चिमुकल्यांचे महाभारत, रामायण या थीमवर स्नेहसंमेलनातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर…

शिरपूर (गोपाल के मारवाड़ी) – आ. अमरिशभाई पटेल व मा. नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील न.प. शाळा क्रं. १, २, ३, ६, ७, ८, ९ तसेच प्री-प्रायमरी स्कूल, सगुनाबेन चंपकलाल वैद्य, नवलबेन गणेश पटेल व मराठी बालवाडी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आर. सी. पटेल जिमखाना येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी न. प. मराठी व सेमी इंग्लिश शाळांच्या चिमुकल्यांनी महाभारत, रामायण या थीमवर स्नेहसंमेलनातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात बालाजी स्वागत गीत, महाराष्ट्र थीम, खानदेश दर्शन, महाराष्ट्र दर्शन, खानदेशी कुलदैवत, शिवाजी महाराज, बालाजी भगवान, महाराष्ट्र थीम, राजस्थानी, पंजाबी आणि गुजराती गीत, आदिवासी गीत, मल्हार गाणे, मंगळा गौरी, कानुबाई उत्सव, जादू-जादू रिमिक्स, दिवाळी उत्सव, महादेव गणपती, बॉलिवुड सॉंग रिमिक्स, बरसो रे मेघा-मेघा, नन्ही सी प्यारी सी, आम्ही अहो मावळचे राहणार, मेरे वतन के लोगो तसेच रामायण, नृत्य व नाटिका यातून विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर करून विविध कला गुणांचे दर्शन घडविले. सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन, सावित्रीबाई फुले, सगुनाबेन वैद्य व नवलबेन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष कै. प्रभाकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर आणि उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, माजी नगरसेविका रंजनाबाई सोनवणे, उज्वला अहिरे, सेवानिवृत्त नगर अभियंता माधवराव पाटील, भाईदास भोई, सतिष कोळी, नेहा निकुम, दिपाली साळुंखे, सागर कुलकर्णी, एस.आर.गवळी, को-ऑर्डिनेटर एलिझाबेथ जानवे, उपसभापती खतिब शेख, सदस्य हिरालाल मराठे, सुरेश चौधरी, सुरेश अहिरे, देविदास माळी, चंद्रकांत माळी, सिद्दीक शेख, किशोर माळी, शिक्षण विभाग प्रमुख मोहन चौधरी, परीक्षक वैशाली मराठे व शीतल पाटील तसेच न.प.शा.क्र.१ ते ९ चे मुख्याध्यापक हररी जुलवाणी, रजेसिंग पावरा, प्रकाश सोनवणे, सैय्यद हयात बाबा, सलमाबी मॅडम, सुनिता सोनवणे, संध्या माळी, रणजीत पाटील, क्रांती देसाई व प्री प्रायमरी स्कूलचे उपप्राचार्य जयश्री चव्हाण, पल्लवी राजपूत, निलोफर मॅडम उपस्थित होते.

न. प. शाळा. नं. ७ च्या मुख्याध्यापिका संध्या माळी यांनी प्रास्ताविकातून वर्षभरात न. प. शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला व शाळेचे विविध स्पर्धेतील कौशल्य व प्राविण्य सर्वांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आरोग्य विभाग प्रमुख दिपाली साळुंखे यांनी केले. अँकरिंग विशाल सोनवणे सर, सोनाली गाडीलोहार मॅडम, आणि पीपीटी फोटो गॅलरी चे प्रात्यक्षिक उज्ज्वल बोरसे सर, विशाल सोनवणे सर आणि जुबैर सर यांनी सादर केले. या सर्व आकर्षक कार्यक्रमांचे उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन विक्की आखाडे व अल्टिमेट डान्स ग्रुप यांनी केले. विकास माळी सर व त्यांच्या विद्यार्थ्यानी सादर केलेले महाभारत व शिवछत्रपती या नृत्याविष्काराने उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दरम्यान बेस्ट टीचर, बेस्ट स्कूल म्हणून प्री प्रायमरी व प्रायमरी सेमी स्कूल यांना ट्रॉफी देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण् यबयात आले. शिक्षण विभाग प्रमुख मोहन चौधरी यांचा सभापती राजेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रोत्साहनपर बक्षीस हे १ ते ३ क्रमांकांना ट्रॉफी देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आभार गणेश माळवे सर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण मंडळ सदस्य, न.प.शाळा क्र. १ ते ९ चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, प्री प्रायमरी स्कूलच्या उपप्राचार्य, प्री प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका, मराठी बालवाडीच्या शिक्षिका, शिपाई व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.