वय फक्त १३..महाराष्ट्राची सुवर्णकन्या जिजाऊ! सुवर्ण हॅटट्रिक ची ठरली मानकरी!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महाराष्ट्राची सुवर्णकन्या जिजाऊ!

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील आसगावची जिजाऊ पाटील. वय फक्त १३. फेन्सिंग खेळात सुवर्ण हॅटट्रिक! ८ ते १० ऑगस्टला हिंगोली येथे झालेल्या सब-ज्युनियर फॉइल स्पर्धेत तिने सलग तिसरे सुवर्ण पटकावले. यानंतर २२ ते २४ ऑगस्टला संभाजीनगर येथे राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेतही सुवर्ण पदकांची दुहेरी कमाई केली. वैयक्तिक आणि टीम – दोन्ही सुवर्ण तिच्या खात्यात जमा झाली. आता पांडिचेरी व उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

जिजाऊने याआधीही राष्ट्रीय स्तरावर पाच पदके मिळवली आहेत. वयाच्या ११व्या वर्षी थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. फेन्सिंग खेळात तिने २०२१ मध्ये प्रवेश केला आणि फक्त चार वर्षांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पुण्यात आणि अहमदाबादमध्ये प्रशिक्षकांकडून तिने सराव केला तसेच अलीकडेच इटलीत ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या कोचकडून प्रशिक्षण घेतले. या प्रतिष्ठित अकादमीत प्रशिक्षण घेणारी ती सर्वात लहान भारतीय ठरली आहे.

दररोज सहा ते सात तासांचा सराव, शिक्षणातील मेहनत आणि कुटुंबाचे पाठबळ या जोरावर जिजाऊची वाटचाल अधिक बळकट झाली आहे. सध्या ती पुण्यातील अक्षरनंदन शाळेत शिकते. मात्र फेन्सिंग हा खर्चिक खेळ आहे. प्रवास, साहित्य व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी मोठा खर्च होतो. आतापर्यंत कुटुंबानेच साथ दिली आहे. आता समाजातील दानशूर मंडळींचा हातभार मिळाला तर जिजाऊ भारतासाठी ऑलिंपिक सुवर्ण नक्कीच आणेल. तिच्या प्रवासात आजोबा, आई-वडील, प्रशिक्षक आणि भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे योगदान मोठे आहे. जिजाऊच्या या सुवर्णयशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.