कोल्हापूरमधून लोकसभेच्या रिंगणात शौमिका महाडिक? त्या बॅनरने चर्चांना उधाण…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अरविंद सावरतकर

मुन्ना महाडिक ही म्हणाले आम्ही रेडी आहोत…

(शौमिका महाडिक यांच्या फोटोच्यावर ‘अब दिल्ली दूर नहीं’ अस वाक्य लिहिलं होतं. कट्टर महाडिक समर्थक कार्यकर्त्याने हे वाक्य लिहिल्यामुळे शौमिका महाडिक या आगामी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. यावर अगदी थेटपणे धनंजय महाडिक यांनी उत्तर दिलंय.)

कोल्हापूर : कोल्हापुरात गणेश विसर्जनाच्या वेळी महाडिक गटाच्या समर्थकांच्यावतीने मिरवणूक मार्गादरम्यान पान सुपारी स्वागत कक्ष उभारण्यात आलं होतं. या कक्षातील फलकावर “दिल्ली अब दूर नहीं” असे लिहिले असल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या निवडणूक रिंगणात उतरणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र उमेदवाराचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार असून सध्या या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत आणि त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र वेळ पडली तर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लढवू. महाडिक कुटुंब लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले आहेत.

पान सुपारी स्वागत कक्षातील बॅनर चर्चेतस्वागत कक्षामध्ये शौमिका महाडिक आणि धनंजय महाडिक यांचा फोटो लावत त्यामध्ये शौमिका महाडिक यांच्या फोटोच्यावर ‘अब दिल्ली दूर नहीं’ अस वाक्य लिहिलं होतं. कट्टर महाडिक समर्थक कार्यकर्त्याने हे वाक्य लिहिल्यामुळे शौमिका महाडिक या आगामी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. महाडिक गटाकडून शौमिका महाडिक लोकसभेच्या रिंगणात? जिल्ह्यात महाडिक गटाची ताकद मोठ्या प्रमाणात असून महाडिक कुटुंबातील खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर निवडून गेल्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे तीन खासदार झाले आहेत. यात शिंदे गटाचे दोन आणि भाजपचा एक खासदार आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जोरदार तयारी करत असून केंद्रीय मंत्र्यांचे दौरे हातकणंगले आणि कोल्हापुरात वाढले आहेत.

आगामी निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळेल याचा निर्णय अद्याप झाला नसला तरी शिंदे गटाचे विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात येणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र जर भाजपकडून तिकीट देण्याची वेळ आली तर गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या रूपाने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तगडा उमेदवार महाडिक कुटुंबीयांकडे असल्याने कार्यकर्त्यांकडून शौमिका महाडिक यांचे नाव सध्या पुढे करण्यात येत आहे. म्हणूनच महाडिक समर्थक कार्यकर्त्याने गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान पान सुपारी स्वागत कक्षामध्ये शौमिका महाडिक यांच्या फोटोच्यावरती ‘अब दिल्ली दूर नहीं’ अस बॅनर लावले होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.