शाहुपुरी पोलिसांकडून बनावट आरसीबुक टोळीचा पर्दाफाश : तीन गाड्या व साहित्य जप्त
कोल्हापूर : शाहुपुरी पोलिसांनी बनावट आरसीबुक तयार करून परस्पर लाखोंच्या गाड्या विकणाऱ्या आंतर-जिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन क्रेटा व एक फॉर्च्युनर गाडी, मोबाईल फोन तसेच बनावट आरसीबुक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा सुमारे ६१ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा एप्रिल ते मे २०२४ दरम्यान घडला असून फिर्यादी सागर हरी देसाई यांची चार गाड्या विक्रीसाठी घेऊन आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून त्या परस्पर विकल्या. तपासात हे नेटवर्क कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आणि बीड या जिल्ह्यांत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी निलेश रामचंद्र सुर्वे, हसन मगदुम जहांगिरदार (रत्नागिरी), मोहम्मद अमजद मोहम्मद कुरेशी (मुंबई), सकिब सलीम शेख (भिवंडी), शहजामा खान बदरुजमा खान आणि शेख शाहनवाज शेख आसेफ (बीड) या सहा आरोपींना अटक केली आहे.
गाड्या विक्रीसाठी त्यांनी बनावट आरसीबुक तयार करण्यासाठी एजंट आणि फोटो स्टुडिओची मदत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट आरसीबुक, पीयुसी कार्ड, प्रिंटर, सीपीयु, मोबाईल फोन्स असा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार, उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष डोके, पो.उपनिरीक्षक आकाश जाधव व यांच्यासह
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृतवाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव मिलिंद बांगर भैरू माने, मंजर लाटकर,कृष्णात पाटील, रवि आंबेकर बाबा ढाकणे, सुशिलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील यांनी ही कामगिरी फत्ते केली.