पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली “संस्कारित पिढी घडविणे हेच राष्ट्रसेवेचे खरे कार्य” या ध्येयाने विविध उपक्रम राबवले जात आहेत.
मागील ऑगस्ट आणि सध्याच्या सप्टेंबर महिन्यात राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी दररोज सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण केले आहे. या सेवेला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, आजवर लाखावधी आवर्तने श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आली आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील बालकांनीही या सेवेत सहभाग नोंदवला आहे.गुरुमाऊलींनी दिलेला संदेश की “घरोघरी पुंडलिक आणि श्रावणबाळ निर्माण झाले तर वृद्धाश्रममुक्त भारताची संकल्पना साकार होईल” — या वाक्यातूनच या चळवळीची दिशा स्पष्ट दिसते. त्यानुसार बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अत्यंत नियोजनपूर्वक कार्यरत आहे.
ऋणानुबंध – पालक-पाल्य सुसंवादाचा दुवा
धावपळीच्या जीवनशैलीत ताणतणाव, गैरसमज, अवास्तव अपेक्षा कमी व्हाव्यात आणि घराघरात प्रेमळ संवाद घडावा या हेतूने “ऋणानुबंध – एक सुसंवाद” हा उपक्रम सुरू आहे. शिक्रापूर आणि कागल सेवाकेंद्रात झालेल्या कार्यक्रमांना पालक, मुले व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. भावनिक वातावरणात झालेल्या या संवादामुळे अनेकांना अक्षरशः गहिवरून आले.
शेंदुरणी (जामनेर) व हेरले (हातकणंगले) सेवाकेंद्रांवर गर्भवती मातांना गर्भसंस्काराचे महत्त्व पटवून देण्यात आले. किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन तर जळगावमध्ये युवकांना पितरांचे महत्त्व समजावले गेले.
मूल्यसंस्कार प्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा
अहिल्यानगर (केडगाव) व मुंबई झोनमध्ये मूल्यसंस्कार प्रतिनिधींच्या कार्यशाळांना उत्साहाने प्रतिसाद मिळाला. जळगाव येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाले असून येत्या २० सप्टेंबर रोजी सिंदखेडा (धुळे) येथे विभागीय प्रशिक्षणाचे आयोजन आहे.
“आदर्श व सदाचारी पिढी घडविणे हे राष्ट्रसेवेचे पवित्र कार्य आहे. सेवामार्गाच्या बालसंस्कार केंद्रांतून ग्राम अभियानाद्वारे ही चळवळ अधिक गतिमान केली जात आहे” असे प्रतिपादन गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी केले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.