पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
वडनेर भैरव कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय दोन दिवसीय बौद्धिक संपदा हक्क कार्यशाळा संपन्न
वडनेर भैरव (नाशिक): संशोधन व पेटंट हा आर्थिक संपन्नतेचा राजमार्ग आणि काळाची गरज आहे. थॉमस एडिसन यांच्या नावावर १,०९३ अमेरिकन पेटंट्स आणि एकूण जागतिक २,३३२ पेटंट्स होते. त्यांच्या शोधांमध्ये फोनोग्राफ, इलेक्ट्रिक बल्ब आणि मोशन पिक्चर तंत्रज्ञानाचा समावेश होता जो आर्थिक संपन्नतेचा राजमार्ग ठरला. जपानचे शुनपेई यामाझाकी यांच्या नावावर ३१ मार्च २०२५ पर्यंत सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, डिस्प्ले, थिन-फिल्म ट्रान्झिस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानावर २० हजार १२० पेटंट्स हे अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड् आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थांनी जास्तीतजास्त प्रॉडक्ट आणि प्रोसेस पेटंटस मिळवून त्यातून आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करावी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होण्यासाठी मविप्रचा पेटंट विभाग नावीन्यपूर्ण, समाजोपयोगी कल्पनांना व्यावसायिकदृष्ट्या बनविण्यासाठी कार्यरत असून त्याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी केले. वडनेर भैरव येथे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे दोन दिवसीय पेटंट कार्यशाळेचे आयोजन झाले त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष इंजि. दिलीपराव धारराव होते. तर व्यासपीठावर इंजि. पोपटराव पाचोरकर, मा. सुनील मामा पाचोरकर, डॉ महेश वाघ, डॉ. प्रकाश लांडगे आदी उपस्थित होते.
स्टार्टअप्ससाठी गरज इनक्युबेशन सेंटरची: प्राचार्य डॉ. महेश वाघ
प्राचार्य डॉ. महेश वाघ यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती व बौद्धिक संपदा संस्कृती रुजविण्यासाठी आयोजित उपक्रमांची माहिती दिली व बौद्धिक संपदा हक्क (IPR) जिल्हास्तरीय कार्यशाळेमागील उद्देश्य स्पष्ट केला. तसेच संशोधन प्रकल्प व स्टार्टअप्स वाढीसाठी इनक्युबेशन सेंटर बनवण्याची गरज अधोरेखित केली. संशोधन व नवकल्पना ही उच्च शिक्षणाची खरी गरज आहे. नजिकच्या भविष्यात महाविद्यालय अधिक दर्जेदार व इन्होवेटिव्ह पेटंट्स मिळवेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऑनलाईन पेटंट फाईलिंगचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण
बीजभाषण शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर डोखे यांनी केले. ऑनलाइन पोर्टलचा वापर व पेटंट अर्ज प्रक्रियेवर अधिक सखोल चर्चा होणार आहे याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. संशोधनातून उद्योगाभिमुख व रोजगारनिर्मिती करणारे उपक्रम उभे राहण्यासाठी पेटंट ही पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात इंजि. दिलीपराव धारराव यांनी केले.
तीन विशेष पेटंट सत्रे
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. अंकिता रायते यांनी पेटंट विषयक सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. विक्रम जाधव यांनी पेटंट प्रक्रियेचे टप्पे व अर्ज प्रक्रिया स्पष्ट केली. शेवटच्या सत्रात डॉ. शरद कांबळे यांनी पेटंटच्या इतिहासापासून ते ऑनलाइन अर्ज प्रक्रियेपर्यंतची माहिती दिली.सूत्रसंचालन डॉ. सुदाम राठोड यांनी तर आभार प्रा. श्रीमती स्वाती जाधव यांनी मानले. या कार्यशाळेला विविध शाखांतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.