सदगुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य…
चिपळूण – श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण तर्फे गेली ७२ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून व लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव अखंडपणे दरवर्षी साजरा करण्यात येतो. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे भाद्रपद गणेशोत्सवा बरोबरच वर्षभर विविध धार्मिक, समाजोपयोगी, लोकाभिमुख उपक्रम राबविले जातात.
![]() |
![]() |
या उपक्रमात दरवर्षी चिपळूण शहर व परिसरातील इयत्ता १० वी उत्तीर्ण गरीब व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना उपलब्ध निधी नुसार शिष्यवृत्ती देण्यात येते. २०२३ मध्ये १० वीत ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना यावर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सदर शिष्यवृत्ती मिळण्याकरीता पात्र विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील मंडळाचा अर्ज स्वच्छ हस्ताक्षरात भरावा व सोबत १०वी गुणपत्रक, रेशनकार्ड व उत्पन्नाच्या दाखल्याची झेरॉक्स जोडून सदर अर्ज मंडळाकडे सादर करावा.
शिष्यवृत्ती मिळण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्ज गौरव ज्वेलर्स, बाजारपेठ, चिपळूण व अक्षर साहित्य, साने गुरुजी उद्यानाशेजारी उपलब्ध अाहेत, तसेच सदर अर्ज याच दोन्ही ठिकाणी शनिवार दि. १० सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे अध्यक्ष मोहन मिरगल व सचिव प्रभंजन पिंपुटकर यांनी केले आहे. या शिष्यवृत्ती बाबत अधिक माहितीसाठी रमण डांगे ९६५७०३७७५५, शेखर लवेकर ९८५०९९२८२६, विलास बांद्रे ८८०५९५५२११, रमेश चितळे ९६०४८०२४३१ यांचे जवळ संपर्क साधावा.