कुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय  प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण – ललित गांधी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आठ लिपीमधील ग्रंथ संपदेसाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार

कुंभोजगिरी – कुंभोज येथे उभारण्यात आलेले सरस्वती साधना केंद्र व याठीकाणी उभारलेले दुर्मिळ ग्रंथ संपदेचे ग्रंथालय हे प्राचीन भारतीय संस्कृती जपण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्रतिपादन जैन विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. सरस्वती साधना केंद्राचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक या नात्याने बोलताना ललित गांधी यांनी सदर साधना केंद्रामध्ये भारतातील अति प्राचीन अशा ब्राम्ही, शारदा, कुटील, देवनागरी, मल्याळी, कन्नड अशा लिपीमध्ये दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्लेखनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सहकार्य केले जाईल असे सांगितले.

आचार्य रैवतसुरीजी, साध्वी शीलवतीश्रीजी, साध्वीजी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी, साध्वीजी उदयप्रभाश्रीजी आदि अनेक साधु-साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत आनंद स्मृति ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र बोहरा (पूणे), अरूण ललवाणी, नरेंद्र जैन, मोहनलाल ओसवाल, अभय गांधी, सुभाष शहा, चंपकभाई शहा, अमृतभाई शहा, माणकचंद लालवाणी आदि विविध समाज अग्रणींसह उपजिल्हाधिकारी जीनल पालरेचा यांच्यासह देशभरातुन आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साध्वीजी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापित या साधना केंद्रामध्ये साध्वीजी सरस्वतीश्रीजी यांनी स्वतः आठ लिपीमध्ये लिहीलेली दुर्मिळ ग्रंथ संपदा यानिमित्ताने प्रदर्शित करण्यात आली आहे. साधना केंद्रामध्ये नवनिर्मित सरस्वती मंदीरामध्ये सरस्वतीच्या प्राचीन ग्रंथात वर्णवलेल्या नऊ वेगवेगळ्या मुद्रांमधील सरस्वती मुर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.

पाच दिवस चालणार्‍या या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातुन साधु-साध्वी-संत, जैन समाज अग्रणी मोठ्या संख्येने कुंभोजगिरी तिर्थावर दाखल झाले आहेत. उद्घाटनानिमित्त ट्रस्ट मंडळातर्फे जैन महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) नाम. ललित गांधी यांचा नऊ लिपित लिहिलेल्या नवकार महामंत्राची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करणेत आला. महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे पहिलेच सरस्वती साधना केंद्र बनले असुन भाविकांनी, ज्ञान साधकांनी व प्राचीन संस्कृती अभ्यासकांनी याठीकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहनही ललित गांधी यांनी याप्रसंगी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.