मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड
गारगोटी प्रतिनिधी – गारगोटी शहरातील युवा स्पोर्ट्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची बैठक दि.03 ऑगस्ट, 2025 रोजी पार पडली तसेच सर्वांची नियुक्ती करण्यात आली या वेळी अध्यक्ष म्हणून समिर शेंडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून प्रज्वल भोई यांची नियुक्ती करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी चिन्मय मांडे, खजिनदार पदी धिरज घावरे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शहर कमिटीचे अध्यक्ष आशिष कांबळे, शहर उपप्रमुख प्रथमेश परीट, कार्याध्यक्ष ओम कांबळे, सचिव सुरज राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर, व्ही. जे. कदम सर, अल्ताफ बागवान, उपसरपंच प्रशांत भोई, विजय सारंग, दशरथ राऊत, संदीप सोरटे, गोपी शुक्ल, निलेश वास्कर, प्रविण भोई विजय चव्हाण, सुशांत सुर्यवंशी यांच्यासह मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.