विनायक जितकर
ग्रामस्थांच्या वतीने कॅण्डल मार्च काढून मनोज जरांगे-पाटील यांना दिला जाहीर पाठिंबा…
![]() |
![]() |
बिद्री – मनोज जरांगे-पाटील यांना व मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मजरे कासारवाडा ग्रामस्थांच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी काळम्मादेवी मंदिर पटांगण येथून कॅण्डल मार्च काढण्यात आला सर्व ग्रामस्थांनी कॅण्डल घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या मध्ये एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, मनोज जरांगे-पाटील तुम अगे बढो हम तुम्हारे साथ है, मनोज जरांगे-पाटलांचा विजय असो च्या घोषणांनी परिसर दनाणून गेला होता.
कॅण्डल मार्च घेऊन कोल्हापूर गारगोटी मार्गावर रास्ता रोको करून राज्य सरकार विरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. या रास्ता रोकोमुळे कोल्हापूर गारगोटी मार्ग चक्का-जाम होऊन काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
या कॅण्डल मार्चचे रूपांतर सभेत झाले. या सभेत मनोज जरांगे-पाटील यांना गावाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला. यानंतर मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना गवबंदीचा ठराव करण्यात आला. यावेळी प्रमोद तौंदकर, बाबुराव साबळे, संजय जितकर यांनी मराठा आरक्षण विषयी आपले मनोगत व्यक्त केली. या कॅण्डल मार्च साठी गावातील सर्व विद्यार्थी, तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.