आमदार राहुल दादा कुल प्रयत्न करणार ….श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक भवन उभारणार!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी आमदार राहुल दादा कुल प्रयत्नशील

दौंड  – श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थेट सतरावे वंशज ह.भ.प. श्री निवृत्ती महाराज नामदास यांच्या प्रमुख उपस्थितीत, दौंड तालुका नामदेव शिंपी समाज व युवक संघाच्या प्रतिनिधींनी दौंड विधानसभेचे आमदार राहुल दादा कुल यांची भेट घेतली.या भेटीत समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील शष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहण्याचे आवाहन नामदास महाराज यांनी आमदार राहुल कुल यांना केले.

दौंड तालुक्यात भव्य संत नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणीही करण्यात आली. या मागणीला आमदार राहुल कुल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, आपल्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

श्री निवृत्ती महाराज नामदास यांनी आमदार राहुल कुल यांचा सत्कार केला व त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. आमदार राहुल कुल यांनी देखील समाजाच्या भावना लक्षात घेऊन, पंढरपूर कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे तसेच समाजाच्या सर्व मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.

या भेटीत सिद्धेश हिरवे, गजानन चुंबळकर, रतन बोधे, निलेश कोपर्डे, विजय बारटक्के, आनंद विकणे, अमित हेंद्रे, कुंडलिक चुंबळकर, संजय बारटक्के, रघुनाथ कोळेकर, सुभाष चुंबळकर, निवृत्ती कोपर्डे, अनिल गुजर, अरविंद धोत्रे, ज्ञानेश्वर शिंपी, अजय कटारे, सतीश कटारे, संजय धोकटे, संदीप बारटक्के (पत्रकार), शुभम हिरवे, सौरभ हिरवे, मधुकर म्हेत्रस, सुमित भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. ही भेट यशस्वी होण्यासाठी सिद्धेश हिरवे, माजी संचालक सुधीर ढमढेरे, रतन बोधे व विजय चुंबळकर यांनी विशेष मेहनत घेतली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.