नागावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार अशोकराव माने

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नागावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार अशोकराव माने

नागाव, ता. हातकणंगले:(रुपेश आठवले) :
हातकणंगले मतदारसंघाचे आमदार आणि दलित मित्र अशोकराव (बापू) माने यांच्या हस्ते नागाव ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व संभाजीनगर येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

आमदार माने म्हणाले, “नागाव हे ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक गाव आहे. येथे मूलभूत सुविधा, दर्जेदार रस्ते, पाणी योजना, आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिकता आहे. नागावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

२५ लाखांचा निधी मंजूर
सदर काँक्रिटीकरणाच्या कामासाठी वसंतराव नाईक तांडा व दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यांमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा लाभणार असून पावसाळ्यातील गैरसोयींचा त्रास कमी होणार आहे.

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
रस्त्याचे उद्घाटन झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी आमदार माने यांचे आभार मानले. युवा नेते विजय पाटील यांनी सांगितले, “गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त होते. हा निधी मिळवून गावासाठी विकासाची वाट उघडणारे आमदार माने यांचे आभार.”

 


या कार्यक्रमास माजी सरपंच अरुण माळी, माजी सदस्य भीमराव खाडे, प्रकाश पवार, किरण मिठारी, सदस्य कुमार राठोड, अश्विनी पाटील, मौसमी कांबळे, सुलोचना कांबळे, सागर गुडाळे, तसेच भाजपाचे बूथप्रमुख सतीश माळी, राहुल खाडे, विवेक नांगावकर, वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, सदस्य अमित खांडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

विष्यातील योजना:

आमदार माने यांनी आरोग्य सुविधा, जलसिंचन, शाळा दुरुस्ती, ग्रामसुधारणा या योजनांचीही माहिती दिली. “फक्त उद्घाटन नव्हे, तर वेळोवेळी पाठपुरावा करून नागावचा चेहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.