दुर्गम शाळांत ‘रॉबिन हूड आर्मी’चा सुखावणारा हात! विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले, पालकही समाधानी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दुर्गम शाळांत ‘रॉबिन हूड आर्मी’चा सुखावणारा हात! विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले, पालकही समाधानी

कोल्हापूर : (रुपेश आठवले )गगनबावडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाच जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना आजचा दिवस खास ठरला! ‘रॉबिन हूड आर्मी कोल्हापूर टीम’ने गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंची मदत करत मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं.

गगनबावड्यातील विद्या मंदिर तळये बु., कोदे खु., कोदे बु., मणदूर व जमसंडेवाडी या शाळांमधील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दप्तर, नोटबुक्स, पाट्या, चित्रकला साहित्य, पेन-पेन्सिल्स, पाणी बाटल्या, स्केच पेन अशा अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण झाल्याने केवळ मुलंच नाही, तर पालकांच्याही काळजाला दिलासा मिळाला आहे. रॉबिन सागर अथणे, संजय शिरगावे, विश्वास जाधव, बाळासाहेब मगदूम, यशवंत पाटील, इम्तियाज मुजावर आणि लव केअर शेअर ग्रुपच्या संस्थापक हार्दिका वसा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमासाठी सेवानिवृत्त जि. प. शिक्षक मा. डी. पी. पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले.शा ळेचे शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना सांगितले की, “दप्तरात पुस्तकांबरोबरच मुलांचे स्वप्नंही भरून दिलीत!”

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.