डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ येथे ध्वजवंदन करताना ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. राकेशकुमार शर्मा, डॉ. अभय जोशी, आर्यमन पाटील आदी.
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आर्यमन ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यानंतर छोट्या मुलांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून प्रसजसत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसी विद्यार्थांनी परेड सादर केली तर विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.
यावेळी सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. सी.डी.लोखंडे, डॉ. अद्वैत राठोड, डॉ. अजित पाटील, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अमृतकुवर रायजादे, रुधिर बार्देसकर, डॉ. उमारणी जे., शंकर गोनुगडे, संजय जाधव, अजित पाटील यांच्यासह विवीध विभागाचे विभाप्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय
कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी कार्यकारी संचालक डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, सी. एच. आर.ओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, आर्यमन पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डॉ. आर. ए पाटील, यांच्यासह अधिष्ठाता विभाग प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतमाता, महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व उपस्थित सर्व शालेय विद्यार्थ्यांची भेट घेऊन विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

















































