खिंडी व्हरवडेच्या शेती पाण्याला दिलासा… पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अथक प्रयत्नांना यश; गावाला मिळाले पाणी आरक्षणाचे मंजुरीपत्र

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मंजुरीचे पत्र पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते ग्रामस्थांकडे सुपुर्द

गुडाळ – राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे गावातील शेतीला पाणी मिळावे, अशी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. या मागणीचा विचार करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या गावातील शेतीला पाणी आरक्षणाची मंजुरी आणली आहे. या मंजुरीचे पत्र पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते ग्रामस्थांकडे सुपुर्द करण्यात आले. दरम्यान, बऱ्याच वर्षांचा रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी, राधानगरी, धामोड या धरणांमुळे तालुक्याचा बहुतांशी भाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र खिंडी व्हरवडे गाव गेल्या अनेक वर्षापासून शेतीच्या पाण्यामुळे वंचित होते. ही समस्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गेल्या दोन दशकांमध्ये अथक प्रयत्न करून दीडशे हेक्टर शेती जमिनीच्या पाण्याचे आरक्षित मंजुरी पत्र शासनाकडून मंजूर करून आणले आहे. हे पाणी आरक्षणाचे मंजुरी पत्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ग्रामस्थांकडे सुपुर्द केले.

ग्रामस्थांमधून समाधान
खिंडी व्हरवडे गावची शेकडो एकर जमीन पाण्याअभावी पडिक झाली आहे. कितीतरी पंचवार्षिक योजनांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी गावाच्या शेतीच्या पाण्याचे आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. पण येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न रखडलेलाच होता. मात्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर हा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

‘टीम दिग्विजयी’चा मोलाचा सहभाग
दिग्विजय, अमृत, संदीप, एस के, अनिकेत, शैलेश, राजाराम सावंत, हर्षवर्धन, अमित आधीनी खूप कष्ट घेतले, दिग्विजय पाटील यांचा नामदार प्रकाश आबिटकर यांच्याशी असलेला डायरेक्ट संपर्क याकामी खूप महत्त्वाचा ठरला.

यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख दिग्विजय पाटील, अमृत शेटके,एस के पाटील, तानाजी पाटील, संदीप खांडेकर, रामभाऊ पाटील, एच.पी पाटील,राजाराम पाटील, मनोहर कांबळे सर,जयवंत कांबळे, एम. एस पाटील साहेब,शैलेश जाधव, राजाराम सावंत, हर्षवर्धन पाटील, विनोद जाधव, अवि कांबळे, गौतम कांबळे, दीपक पाटील अशोक पाटील मिस्त्री ,शहाजी पाटील, मोहन खांडेकर,मधुकर सावंत, राजाराम पवार ,अमित भोपळे, कुंडलिक भोपळे शुभम शेटके ,आशिष भोपळे, स्वप्निल मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.