जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीची शिबिरे…
कोल्हापूर – 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मतदार जागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबीरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघ स्तरावर हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यात मतदान केंद्रावर नव्याने नावनोंदणी केलेल्या युवा मतदारांना समारंभपूर्वक PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र तसेच नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांना e-EPIC उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मतदारांनी कार्यक्रमास उपस्थित राहून उस्फूर्त सहभाग नोंदवावा. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेमध्ये तसेच अन्य सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी व विशेषतः नवमतदारांनी मतदानाचा पवित्र व अमूल्य हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2658316 वर संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले आहे.