“सह्याद्रीची नैसर्गिक मेजवानी” “निसर्गप्रेमींसाठी असा हाेणार उत्सव”

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, त्यांचा वापर आहारात करावा,निसर्गप्रेमींंनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात.

सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, त्यांचा वापर आहारात करावा,निसर्गप्रेमींंनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करुन त्यांचे फायदे मिळवावेत ह्यादृष्टीने एनजीओ कंपॅशन २४,कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने जवळपास २०० हुन अधिक रानभाज्यांचे आणि सेंद्रिय उत्पादनांचे माहितीपूर्ण प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी ४ आणि ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्सटेंशन टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ ह्या वेळेत आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती एनजीओ कंपेंशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आयोजकांचे आवाहन

या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यवर्धक रानभाज्या व सेंद्रिय उत्पादनांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे. चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल, असे कंपॅशन २४ व कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सांगितले.

पाककृती स्पर्धेसाठी संपर्क

  • सौ. मंजिरी कपडेकर : ९३७३३१९४९५

  • ऐश्वर्या जामसंडेकर : ७६२०६१९४९५

चॅनल बी प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन क्लब कोल्हापूर, सौ.मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस, युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन तसेच डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर,सार्थ, व्ही.टी.पाटील फौंडेशन, सिद्धगिरी नर्सरी आणि अवनी संस्था या सर्व संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे.
पत्रकार परिषदेस निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ.मधुकर बाचुळकर, डॉ. दिलीप माळी,पल्लवी कुलकर्णी, मंजिरी कपडेकर , शरद आजगेकर, अनुराधा भोसले, मोहन माने, अभिजित पाटील,प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, को -चेअरमन अमृता वासुदेवन, कविता घाटगे, जितेंद्र शाह आणि निसर्ग अंकुर संस्थेचे , व्ही.टी.पाटील फौंडेशन आणि गार्डन क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार्य करणाऱ्या संस्था गार्डन क्लब कोल्हापूर, व्ही.टी. पाटील फाउंडेशन, सिद्धगिरी नर्सरी, अवनी संस्था, डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय, सार्थ संस्था तसेच अन्य स्थानिक संस्था

  • प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

    • आयोजक : एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर, निसर्ग अंकुर संस्था, इकोस्वास्थ व किर्लोस्कर ऑईल इंजिन्स

    • ठिकाण : श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्सटेंशन टाकाळा, कोल्हापूर

    • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

    • तारीख : ४ आणि ५ ऑक्टोबर २०२५

    • प्रवेश : सर्वांसाठी विनामूल्य

उद्घाटन असे हाेणार.

  • शनिवार, ४ ऑक्टोबर सकाळी १०.३० वाजता

  • उपस्थित मान्यवर :

    • हसन मुश्रीफ (मंत्री, वैद्यकीय शिक्षण)

    • धनंजय महाडिक (राज्यसभा खासदार)

    • संजय मंडलिक (माजी खासदार)

    • बसवराज मास्तोळी (सहसंचालक, कृषी केंद्र)

    • डॉ. ज्योती जाधव (प्रमुख, जैवतंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ)

    • इतर मान्यवर अधिकारी

  • दुर्मिळ रानभाज्यांचा समावेश

    गारंबी, टेटू, खाजकुहीली, शेरणी, सोनार वेल, जिवंती, नळीची भाजी, समुद्रशोक, सफेद मुसळी, मांजरी, कोळयाचो माड, करटोली, बाफेली, पानांचा ओवा, कपाळफोडी, सुरण, भारंगी आणि अनेक रानभाज्यांची ओळख व चव चाखण्याची संधी येथे मिळणार आहे.

.

खास आकर्षणे

    • २०० हून अधिक दुर्मिळ रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन

    • या रानभाज्यांच्या बियाणे, रोपे आणि कुंड्या उपलब्ध

    • सेंद्रिय उत्पादनांचे ३५ स्टॉल्स : गूळ, मध, धान्य, कंपोस्ट खत, हर्बल औषधे, भाजीपाल्याची पावडर व खाद्यपदार्थ

    • रानभाज्यांची छायाचित्र प्रदर्शने, मार्गदर्शक पुस्तके आणि खाद्यपदार्थ प्रात्यक्षिके

    • सेंद्रिय उत्पादनांची माहिती डॉ. दिलीप माळी यांच्यामार्फत

    • महिलांसाठी पाककृती स्पर्धा : रविवार, ५ ऑक्टोबर दुपारी १२ वाजता

      • ग्रामीण आणि शहरी विभागांसाठी स्वतंत्र गट

      • विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.