राजारामदास महाराज पुण्यतिथीनिमित्त पिकनिक सेंटरजवळील मठात कार्यक्रम…
कोल्हापूर – येथील ब्रह्मपुरी पिकनिक सेंटरजवळील महंत राजारामदास गुरू नारायणदास मठ येथे राजारामदास महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त रविवारपासून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
रविवारी सकाळी सात वाजता अभिषेक व इस्कॉन हरिओम नगर यांचे संकीर्तन व पंचगंगा नदीवर गजर फेरी होईल. नऊ वाजता श्री राम नामाचा जप, दुपारी मंत्रघोषात पादुकांना अभिषेक, दुपारी चार वाजता शिवाजी हुपरे यांचा भाव, भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी सहा वाजता चिन्मय पुष्पांजलीचे स्वामी दत्तराजानंद यांचे प्रवचन व सात वाजता भक्ती संगीताचा जागर होईल.
यामध्ये संतोष अंगापूरकर, रणजित भुगले, कुशिरेकर बुवा मंच, डॉ. शिवानी ढेरे-कणकवलीकर, गिरीधर कुलकर्णी, रवी सुतार स्वामी समर्थ भजनी मंडळ, चिले भजन देवकर महाराज आपली सेवा अर्पण करतील. सोमवारी सकाळी नऊ वाजता मूर्तीस पुष्पहार अर्पण व मंगळवारी दुपारी १२ वाजता महाप्रसाद होईल. दरम्यान, मठामध्ये होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन जयसिंगराव हुजरे यांनी केले आहे.