राधानगरी तालुक्याने दूध वाढीचा उच्चांक करावा – अरुण डोंगळे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

नरतवडे येथे राधानगरी तालुका दूध संस्था प्रतिनिधी संपर्क मेळाव्यात बोलताना गोकूळचे अध्यक्ष अरुण डोंगळे समोर उपस्थितीत संस्था प्रतिनिधी…

सरवडे – गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची राधानगरी तालुक्याला दोन वेळा संधी मिळाली. अध्यक्षांचा तालुका म्हणून आता राधानगरी तालुक्यातून दूध वाढीचा उच्चांक करावा तरच जिल्ह्यात दुग्ध उत्पादनात क्रांती होईल असे आवाहन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले.

नरतवडे (ता. राधानगरी) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या राधानगरी तालुका दूध संस्था प्रतिनिधी संपर्क मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. डोंगळे पुढे म्हणाले, दूध उत्पादकांचे हित डोळ्यासमोर समोर ठेऊन संघाचा कारभार सुरू आहे. संघामार्फत अनेक सेवा सुविधा पुरवल्या जात असून त्याचा लाभ घेवून दूध उत्पादन वाढवले पाहिजे. दूध उत्पादकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी संपर्क सभांचे आयोजन करण्यात आले असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. संचालक अभिजित तायशेटे यांनी स्वागत केले. संचालक किसन चौगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विश्वास पाटील, संभाजी देसाई, नामदेव पाटील यांच्यासह अनेक संस्था प्रतिनिधींनी आपल्या समस्या व्यक्त केल्या. याप्रसंगी अरुण डोंगळे यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर दहा वेळा संघाचा ‘गोकुळश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल शांताराम आनंदा साठे (सरवडे) यांचा अध्यक्ष डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वेळ वाया घालवू नका..आजच बूक करा..

याप्रसंगी गोकुळच्या पशुवैद्यकीय अधिकारी मारहाण प्रकरणात कर्मचारी संघटनेने आक्रमक आंदोलन केल्यानंतर सामंजस्याने तोडगा काढल्याबद्दल संचालक रणजीत पाटील, दूध संकलन अधिकारी आशिष पाटील, युनियन प्रतिनिधी सुहास डोंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामकाजाबद्दल महिला विकास अधिकारी नीता कामत राधानगरी तालुक्यातील काही आदर्श सुपरवायझरांचेही सत्कार करण्यात आले. मेळाव्यात विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली.

यावेळी सभेस संचालक विश्वासराव पाटील, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, रणजितसिंह पाटील, एस. आर. पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमर पाटील, बयाजी शेळके, नंदकुमार ढेंगे, बाळासो खाडे, अंबरीश घाटगे, श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व सर्व दूध संस्था पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी केले. संचालक आर. के. मोरे यांनी आभार मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.