मुधाळतिट्टा | विनायक जितकर
“एका किलो सोन्याची डील आहे… तेही तोळ्याला फक्त पंचवीस हजार!”
— एवढ्या ‘गोड’ ऑफरने वसंत भोसले (रा. कळंकवाडी) यांच्या डोक्यात सोन्याचे आकडे फिरू लागले. पण काही दिवसांतच त्यांच्या स्वप्नांचा सोन्याचा गडगडाट झाला. आणि लक्षात आलं, की आपण साडेबारा लाखांचं शिकार झालोय…
राधानगरी तालुक्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. “प्रति तोळा केवळ २५ हजार रुपये दराने एक किलो सोने मिळवून देतो,” अशी आमिष दाखवत तब्बल १२ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आणखी फसवणुकीची प्रकरणं समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी वसंत शिवाजी भोसले (रा. कळंकवाडी, ता. राधानगरी) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, भाऊसो कृष्णात कुंभार (रा. कुंभारवाडी, केळोशी) या इसमाने सोन्याच्या व्यवहाराच्या नावाखाली त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी आणि पद्धतीने मोठी रक्कम उकळली.
माहिती अशी– फसवणूक कशी केली गेली?
Positive Watch चा दृष्टिकोन:
|
तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस कर्मचारी कृष्णात खामकर यांनी भाऊसो कुंभार याचा मागोवा घेऊन त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर प्राथमिक चौकशीत आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर येत असून, याप्रकरणी आणखी व्यक्ती फसवल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर या आरोपीने अन्य कोणालाही अशा प्रकारे फसवले असेल, तर त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा. सोन्यासारख्या मौल्यवान बाबतीत कुणावरही आंधळा विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. |
कधी तारळे येथे अडीच लाख, तर कधी शिरगाव येथे दीड लाख, तर फोनपे सारख्या डिजिटल माध्यमातून आठ लाखांहून अधिक रक्कम आरोपीने घेतली. संपूर्ण व्यवहारात १२ लाख ५९ हजार रुपये देऊनही एक ग्रॅम सोने मिळाले नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोसले यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास सुरु आहे.