विनायक जितकर
युवा नेते राजाराम भाटळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा मोर्चाचे आयोजन… मराठा आरक्षणसाठी आज राधानगरी बंद…
राधानगरी – अंतरवाली सराटी, जालना येथे शांततेच्या व न्याय मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन व उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील माता- भगिनी, अबाल वृद्ध यांचे वर पोलिस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्त राधानगरी तहसील कार्यालयावर युवा नेते राजाराम भाटळे यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी व राधानगरी परिसरातील मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून आज राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देऊन मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधले आहे.
![]() |
![]() |
या निवेदनात म्हटले आहे की, अंतरवाली सराटी, जालना येथे शांततेच्या व न्याय मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन व उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील माता – भगिनी, अबाल वृद्ध यांचे वर पोलिस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा सुत्रधार कोण? याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करनेत यावी. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेणेत यावेत. तसेच आतापर्यंत मराठा आंदोलन कर्त्यांवर दाखल केलेले सर्वच गुन्हे मागे घेणेत यावेत. मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असून आज पर्यन्त त्याची दखल सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे मराठा समजावर कित्तेक वर्षे अन्याय होत आहे. तरीही मराठा समाज सामाजिक बांधीलकी व प्रशासनाचा मान राखून शांतपणे आंदोलन करत आहे. परंतु आज पर्यन्त मराठा समजाच्या चांगुलपणाचा गैर फायदा घेऊन त्यांच्या हककाच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करून तात्काळ आमच्या हक्काचे आरक्षण देवून आमच्यावरील अन्याय दूर करावा. आमचा मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील (अंतरवाली सराटी, जालना) हे गेली 12 दिवस अन्न त्याग करून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांचे जीवितास काही बरे वाईट झालेस त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील याची दखल घ्यावी व मराठा समजाच्या सर्व मागण्या शासन दरबारी तात्काळ कळवून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सरपंच सविता भाटळे, उपसरपंच अरुणा पोवार, माजी जिल्हापरिषद सदस्य जगदीश लिंग्रज, गोविंद चौगुले, बाळासो कळमकर, शरद पडळकर, संजय गोजरे, शुभम पाटील, दया सांगावकर, सावित्री गुरव, बाजीराव चौगुले, प्रकाश कोगेकर, कृतुजा म्हापसेकर, वैशाली किल्लेदार, उत्तम पाटील, डी एस कांबळे, जयदीप पालकर, अरविंद पोवार, विकास पाटील, संजय कांबळे, रवी भाटळे, यांच्यासह तालुक्यातील अनेक मराठा समाजाचे बांधव व विविध समाजचे बांधव मोर्चात सहभागी झाले होते.






















































