नाशिक पोलिस व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनतर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान
नाशिक :(विलास गायकवाड)
नाशिक शहर पोलिस आयुक्तालय व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत पोस्टरचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले.
या अभियानाचे उद्घाटन नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत तसेच दक्ष न्यूजचे संचालक करणसिंग बावरी उपस्थित होते.
कार्यक्रमात कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनच्या वतीने आयुक्त संदीप कर्णिक यांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत “ड्रग्स मुक्त समाज – सुरक्षित समाज” हा संकल्प दृढ करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल परदेशी, राष्ट्रीय महिला संगटक मंत्री आरती आहिरे, ॲड. सुरेंन्द्र सोनवणे, प्रा. सोमनाथ विघे, रजनीश सोनार, संतोष पाटील, उमेश नारद नायक, चंद्रकांत महाले, मनिष मुथ्या, संगिता हिंगमिरे, ॲड. कामिनी भानुवंशे, ॲड. तिलोत्तमा बोरोले, रुपाली तांबारे, प्रिया कुंभार, सोनी सोनसळे, अलकनंदा जोशी, सारिका नागरे, सविता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
️ फोकस
“अंमली पदार्थ एका घरातील आनंद हिरावून नेतात आणि समाजाचे भविष्य उद्ध्वस्त करतात. युवकच आपला देशाचा आधारस्तंभ आहेत, त्यांनी व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीत पुढाकार घ्यायला हवा,” – पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
















































