भिलार गणातून पंचायत समितीसाठी पुनम गोळे यांची उमेदवारी जाहीर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पुनम गोळे या सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय

पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गणातून आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी पुनम गोळे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भिलार परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पुनम गोळे या सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत. गावपातळीवरील विविध प्रश्न, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने भिलार गणातून त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलताना पुनम गोळे यांनी, “भिलार गणातील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. गावागावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करेन,” असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यावर भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भिलार गणातील स्थानिक कार्यकर्ते, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. पुनम गोळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या असल्याने त्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, त्यांच्या उमेदवारीमुळे भिलार गणातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून, येत्या काळात प्रचाराला वेग येणार आहे. विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पुनम गोळे यांच्याकडे पाहिले जात असून, पंचायत समिती निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.