गुन्ह्याची तक्रार दिली? मग ‘मिशन प्रगती’तून व्हॉट्सअॅपवर अपडेट्स मिळवा, निर्धास्त रहा!
रत्नागिरी : पोलिस स्टेशनचे फेऱ्या मारण्याचे दिवस आता संपले! गुन्ह्याची तक्रार दिल्यानंतर ती कुठपर्यंत पोचलीय, पोलिस तपासात काय प्रगती आहे, हे आता तक्रारदाराला घरबसल्या मोबाईलवर कळणार आहे. जिल्हा पोलिस दलाने ‘मिशन प्रगती’ आणि ‘मिशन प्रतिसाद’ या दोन उपक्रमांना नवसंजीवनी देत नागरिकांची सोय सुनिश्चित केली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाडही उपस्थित होत्या.
तक्रारीचा तपास थेट मोबाईलवर!
नवा कायदा आणि गृह विभागाच्या आदेशानुसार आता प्रत्येक तक्रारदाराला पोलिसांकडून तपासाची स्थिती कळवली जाणार आहे. यासाठी पोलिस स्टेशनमध्ये फेऱ्या मारायच्या नाहीत. केस कुठपर्यंत पोचली, कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, याची माहिती थेट व्हॉट्सअॅप किंवा फोन कॉलवर मिळणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही यावर लक्ष असेल, त्यामुळे पोलिसांचा तपास अधिक पारदर्शक आणि गतिमान होईल, असा विश्वास बगाटे यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठांसाठी ‘मिशन प्रतिसाद’चा आधार
ज्येष्ठ नागरिकांना घरगुती अडचण असेल, छळ होत असेल किंवा इतर कोणतीही मदत लागल्यास पोलिस तत्काळ घटनास्थळी धाव घेणार आहेत. ९६८४७०८३१६ व ८३९०९२९१०० हे हेल्पलाईन क्रमांक विशेषत: ज्येष्ठांसाठी सक्रिय ठेवले असून मदत पोचल्याचे फोटो, प्रतिसाद यंत्रणेपर्यंत पोहोचवले जातील.“जुनी यंत्रणा होती, पण तिला नवचैतन्य देऊन आता प्रत्यक्ष अंमलबजावणी मजबूत केली आहे,” असे अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले.
पोलिस ठाण्यात तक्रार? मग निर्धास्त व्हा!
✅ ‘मिशन प्रगती’ — तपासाची अपडेट्स आता थेट WhatsApp वर!
✅ ‘मिशन प्रतिसाद’ — ज्येष्ठ नागरिकांसाठी तत्काळ मदत व हेल्पलाइन!
तक्रार द्या… पोलिस तुमच्यापर्यंत पोचणार!
हेल्पलाइन: ९६८४७०८३१६ | ८३९०९२९१००ऑनलाइन सेवा पण वापरा!
‘आपले सरकार’ पोर्टलवर गृह विभागाच्या तब्बल १७ सेवा ऑनलाइन आहेत. परंतु अजूनही नागरिक त्याचा पूर्ण लाभ घेत नाहीत. त्यामुळे या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले.
GOOD NEWS : तक्रार द्या… नि निर्धास्त रहा!
पोलिस आणि जनतेतला विश्वास दृढ व्हावा, संशय, दबाव किंवा हेलपाटे नकोत, म्हणून ‘मिशन प्रगती’ आणि ‘मिशन प्रतिसाद’ हे दोन उपक्रम आता नव्या जोमात राबवले जाणार आहेत.तक्रार दिली की आता पोलिस तुमच्यापर्यंत पोचणार आहेत — आणि तेही व्हॉट्सअॅपवर!
GOOD NEWS : पोलिसांत तक्रार द्या… नि निर्धास्त रहा!
तुमची केस आता व्हॉट्सअॅपवर अपडेट!
मिशन प्रगती :
गुन्ह्याची तक्रार दिल्यावर पोलिस स्टेशनचे चकरा संपले!
आता तपास कुठे पोहचला, कुणाकडे आहे, काय प्रगती? सगळं मोबाईलवर.
पोलिस अंमलदार तपासाची माहिती कॉल / WhatsApp वर पाठवणार.
वरिष्ठ अधिकार्यांचेही यावर लक्ष असणार.
कारभार पारदर्शक – लोकांचा वेळ वाचणार!
मिशन प्रतिसाद :
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास हेल्पलाइन!
घरगुती अडचण, छळ, त्रास – काहीही असो, पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचणार.
मदत दिल्याचा फोटोही वरिष्ठांना पाठवला जाणार.
हेल्पलाईन नंबर : ☎️ ९६८४७०८३१६, ८३९०९२९१००
डिजिटल पोलिसिंग :
आपले सरकार पोर्टलवर गृह विभागाच्या १७ सेवा ऑनलाईन!
जनजागृती कमी असल्याने कमी प्रतिसाद, पण आता लोकांनीच पुढे यायला हवे!
पोलिस बदलतायत!
नागरिकांची सोय, सुरक्षितता, पारदर्शकता हेच ध्येय!
तक्रार द्या… पोलिस ठाण्यात चकरा मारू नका… मोबाईलवर बघा आणि निर्धास्त रहा!
️ — जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची माहिती.