शाळेची मुलं भरली… पोलिसांनी गाडी हेरली; आणि करावाई केली!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शाळकरी वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहनचालकांवर विशेष मोहीम

कोल्हापूर:TEAM WATCH

शहरातील शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांच्याकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

दिनांक ८ जुलै ते १० जुलै या तीन दिवसांच्या काळात शहरातील शाळकरी मुलांना ने-आण करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. परवानगीपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एकूण ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठरवलेली वाहतूक नियमावली सर्व वाहनधारकांनी पाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली. परवान्यापेक्षा जास्त विद्यार्थी न घेता वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.