लोक कलाकारांसाठी कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कविवर्य सखाराम खोत लिखित ‘ज्ञानबंधू गाथा’ पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन

गारगोटी प्रतिनिधी – कविवर्य सखाराम खोत यांनी परिस्थितीवर मात करत कला जोपासली. लोककलाकार म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी आहे, असे गौरवोदगार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी काढले. गारगोटी येथे कविवर्य व शाहीर सखाराम संभाजी खोत (बंधू-सखा) यांच्या ‘ज्ञानबंधू गाथा’ खंड १ ते ७ या पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते व शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी बोलताना नामदार प्रकाश आबिटकर म्हणाले, कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रगल्भ विचारावर आधारित आहे. कविवर्य सखाराम खोत यांनी केलेले लिखाण हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. लोककलाकार म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्यासाठी एकूण आदर्श म्हणून त्यांच्या लिखाणाकडे पाहिले जाईल. अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा.डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, कविवर्य सखाराम खोत यांच्या पुस्तकावर भविष्यात संशोधन होऊ शकेल. त्यांचे लिखाण समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरेल. कविवर्य खोत यांनी केलेले लेखन डॉक्टरेट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शोध प्रबंध ठरु शकेल. प्रकाशित झालेले हे सातही खंड साहित्य क्षेत्रातील मापदंड ठरतील असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी याप्रसंगी भाई आनंदराव आबिटकर, सदाशिव खेगडे, श्री.मौनी विद्यापीठाचे शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, गारगोटीचे उपसरपंच प्रशांत भोई, शाहीर सखाराम लोंढे, शाहीर जयवंत रणदिवे (सांगली), सचिन माळी (मंडणगड, रत्नागिरी), सयाजी गायकवाड (सोलापूर), तानाजी कुराडे (कोल्हापूर), दत्तात्रय सावंत महाराज, कवी सातापा सुतार यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत शेकडो शाहीर व लोककलाकार उपस्थित होते. याप्रसंगी जयवंत वायदंडे यांच्यासह कलाकारांनी लोककलाकारांच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री नाम. आबिटकर यांना दिले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सर्जेराव मोरे यांनी, पाहुण्यांचा परिचय प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.अतुल कुंभार यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.