पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
काेल्हापूर- दिवाळी येताच… गावागावात पाेहाेचते हक्काची लाल परी.. कितीही गर्दी वाढाे. प्रवाशांची संख्या कितीही असाे.. काेल्हापुरातून तुम्हाला घराेघरी पाेहाेचणार एस. टी. बस. म्हणूनच काेल्हापूर विभागामार्फत आगार विभाग नियंत्रक, अनघा बारटक्के यांनी विशेष व्यवस्था केली आहे.
प्रवाशांची गैरसाेय हाेणार नाही याची काळजी घेताना अधिकाधिक एस. टी. बसेस कशा सुस्थितीत, वेळेत आणि प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या घरी पाेहाेचवितील याची काळजी घेणार आहेत. प्रवाशांच्या साेयीसाठी काेल्हापूर आगारासह, राज्यातील सर्वच कर्मचारी, चालक, वाहक देखील तुमची दिवाळी सुखावण्यासाठी, फराळाची गाेडी वाढविण्यासाठी सज्ज झालेत.
दिवाळी सणानिमित्त प्रवाशी वर्गाची होणारी संभाव्य गर्दीचा विचार करुन, राज्य परिवहन मंडळ कोल्हापूर विभागामार्फत दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरीता मुंबई, पुणे, बीड, परभणी, अक्कलकोट, तुळजापूर व बेंगलोर अशा विविध मार्गावर जादा वाहतूक करणेत येणार आहे. दिवाळी पूर्व वाहतूकीकरीता दिनांक ०९ ते ११ या कालावधीत पुणे मार्गावर नियमीत बसेसव्यतिरीक्तं २२० जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्या आहेत.
दिवाळी झालेनंतर परतीच्या वाहतूकीचेही नियोजन करणेत आलेले आहे. या फे-या ऑन-लाईन आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. अधिक माहितीकरीता कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरील नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक (०२३१) २६६६६७४ / २६५०६२० येथे संपर्क साधून चौकशी करता येईल. तसेच रा.प. महामंडळाच्या www.msrtcors.co.in या वेबसाईटवर घ MSRTC Mobile Reservation App याद्वारे देखील प्रवाशांना आगाऊ आरक्षण करता येईल. तसेच दिवाळी सणामध्ये भाऊबीज निमित्त प्रवासी गर्दीनुसार जिल्हातंर्गत ग्रामीण मार्गावर जादा वाहतूक करणेत येणार आहे. सदर कालावधीत प्रवास करणेसाठी प्रवाशांनी रा.प. महामंडळाच्या चार दिवस व सात दिवस आवडेल तेथे प्रवास या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन अनघा बारटक्के यांनी केले आहे. प्रवाशांनी सुखकर व सुरक्षित प्रवासासाठी रा.प. महामंडळाच्या बसेसचा लाभ घ्यावा असेही शेवटी विभाग नियंत्रक, श्रीमती अनघा बारटक्के म्हणाल्या.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.