हा तर खडतर…. घाट भुईबावडा! प्रवास धाेकादायक; दुर्लक्ष बांधकामचे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भुईबावडा घाट बनला ‘खडतर ‘ *

संरक्षक भिंती, कठड्यांची डागडुजी करण्याची आवश्यकता. *

दगडी कोसळण्याचा धोका:

वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

वाचा सविस्तर- पाँझिटीव्ह वाँच टीम मिडीया- विजया पाटील

गगनबावडा : करूळ घाटाला पर्याय असणारा भुईबावडा घाट वाहतुकीला खडतर बनला आहे. घाटातील सरंक्षक भिंती, कठडे यांची दुरवस्था झाली आहे. या घाट रस्त्याची संपूर्ण दुरूस्ती करणे आवश्यक आहे. संबधित विभागाने घाटमार्गाकडे केलेले दुर्लक्ष विचारात घेता भुईबावडा घाटमार्ग भविष्यात नामशेष होण्याची भीती जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. कोकण व घाटमाथा यांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणून करूळ, भुईबावडा घाटाकडे पाहिले जाते. खारेपाटण – गगनबावडा मार्गावर ९ कि.मी. अंतराचा भुईबावडा घाट आहे.साधारणतः ४ कि.मि. रस्ता वाहतुकीला अत्यंत धोकादायक बनला आहे. तर घाटमार्गातील संपूर्ण रस्ता अरूंद आहे. त्यात शेकडो फूट उंचीच्या दरडी आहेत. तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. कोकणातील प्रमुख घाट रस्त्यापैकी भुईबावडा घाट मानला जातो. मात्र, संबधित विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या घाटरस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

चार – पाच वर्षापूर्वी घाटातील संरक्षक कठडे कोसळले आहेत. तर संरक्षक भिंतीचीही दुरवस्था झाली आहे. अरूंद रस्ता व घाटरस्त्याची झालेली परवड यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. असुरक्षित असलेल्या या घाटात सहा ठिकणी केव्हाही दरडी कोसळतील, अशी भीती आहे. दोन ते तीन बर्ष या घाटाकडे प्रशासनाने दुर्लश केले आहे. गगनबावडयापासून दीड कि.मी. अंतरावर संरक्षक भिंत बांधण्याचे एकमेव काम करण्यात आहे . करूळ घाटरस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून भुईबावडा घाट रस्त्याकडे पाहिजे जाते.करुळमार्गे वाहतूकीत मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांवर मोहिनी घालणारा घाट म्हणून याचा उल्लेख केला जातो. वाढता पर्यटनदृष्टीकोन लक्षात घेऊन करूळ घाटमार्गाचे रूंदीकरण करण्यात आले आहे.

दरवर्षी क्रॅश बॅरिअर लावणे, डांबरीकरण करणे, संरक्षक भिती बांधणे, दिशादर्शक फलक लावणे यासारखी कामे केली जातात. पर्यटकांना मनमुराद आनंद घेण्यासाठी करूळ घाटात पर्यटन पॉईंटची उभारणी करण्यात आली आहे. मात्र. भुईबावडा घाटाची पारिस्थिती याऊलट आहे. बांधकाम विभाग तितकेसे लक्ष देत नाही. भाविष्यात हा घाट नामशेष होणार असल्याची शक्यता काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. भुईबावडा घाटाचे फेरसव्हेंक्षन करून नियोजबद्ध आराखडा तयार करण्याची गरज आहे. घाटाच्या पुनर्बाधणीसाठी भरीव निधीच्या तरतूदीची आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात यामार्गे वाहतूक करणे खूपच जिकिरीचे होणार आहे.

तुमच्या परिसरातील समस्या, सकारात्मक बातम्या.. सामाजिक विषय देण्यासाठी आमचे पाँझिटीव्ह वाँच बांधिल राहिल…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.