काेल्हापूरः व्यंकाप्पा आंब्रे
एका बाजूला एस. टी. टिकावी म्हणून चालक, वाहक दरराेज प्रयत्न करताहेत. खासगी वाहनांच्या स्पर्धेत टिकावे यासाठी चालक वाहक दिवसरात्र करताहेत. दुसऱ्या बाजूला प्रवाशीही गड्या आपली एस. टी. बरी म्हणत गाव तिथे प्रवास करताहेतत.. पण एस. टी विभागाचा यांत्रिकी विभागाचा कारभार कधी सुधारणार हा खरा प्रश्न आहे. दिवसेंदिवस रस्त्यावर बंद पडणाऱ्या गाड्या हा चिंतेचा विषय बनला आहे. यातून चालक वाहकांबराेबरच प्रवाशांनही याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाातून चार ते पाच गाड्या काेल्हापूर जिल्ह्यात काेणत्या काेणत्या आगाराच्या बंद पडलेल्याचे चित्र दिसत आहेत. त्यातच जुन्या गाड्या.. जुनी इंजिन याचाही फटका चालकांना बसत आहे. तरीही बिचारे प्रवाशी एस. टी.ने प्रवास करत आहे. गेल्या काही वर्षापासून एसटी. विभागात जु्नी इंजिन व नव्या बाँडीच्या एस. टी. बसेस धावतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी एस. टी. बस पडत आहेत.
आता हाच प्रकार पहा ना.. काेल्हापूर शहरातल घडलेली सायंकाळचीच घटना.. एका बाजूला वाहनांची गर्दी.. जाे ताे वाट काढण्याच्या नादात, पुढे जाण्याच प्रयत्न करत असतात. अशातच. काेल्हापूर येथील टेंबलाई नाका चाैक येथे.ही एस. टी बस अचानक बंद पडली. त्यामुळे प्रवाशी, नागरिक यांच्यासह वाहतूक पाेलीसाचीही यावेळी येते दमछाक झाली. त्यामुळे अखेर वाहतूक काेंडी दूर करण्यासाठी प्रवाशांनाच या एसटीला. धक्का मारावा लागला. त्यामुळे चक्क एका प्रवाशाने प्रतिक्रीया दिली की.. एस. टी बस चे तिकीट काढा आणि धक्का मारा व घरा पर्यंत जा. यातून तरी एस. टी. प्रशसन काही बाेध घेणार का नवी एस,. टी. बस सुस्थिती ठेवणार का.. स्पर्धेच्या युगात महामंडळ आहे, त्या बसेसची देखभाल व दुरुस्ती व्यवस्था चांगली करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आधीच एस. टी. बसचे अधिकारी साथ देत नाहीत, अर्थकारणात एस. टी. बस सेवा बुडाली. डुबली असे म्हणत असताना आपल्या सेवेत व कर्तव्यात सुधारणा करणे काळाची गरज आहे. इतकीच माफक अपेक्षा एस..ला लाभलेल्या प्रवाशांची अपेक्षा आहे. एस. टी. टिकली पाहिजे, जगली पाहिजे.. आमची लालपरी धावलीच पाहिजे. अशी आजही असंख्य प्रवाशी वर्गाची इच्छा आहे. ती पूर्ण करणे एस. टी. महामंडळ आणि यांत्रिकी विभागाचे कर्तव्य आहे.