विनायक जितकर
मजरे कासारवाडा येथील तरुणांच्या वतीने श्रीराम प्रतिमेचे विधिवत पूजन…
कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातील तरुण मंडळांच्या वतीने श्रीराम यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी श्री काळम्मादेवी भजनी मंडळाचे भजन आणि दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावातील सर्व मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सायंकाळी ७.०० ते ९.०० वेळेत श्री. मारुती लवटे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर गावातील तरुणांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्य सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी गावातील सर्व जेष्ठ नागरिक व महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.