दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दूध अनुदानाबाबत मुंबईत जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न… दूध अनुदानासाठी पशुधनाचे टॅगींग होणे फार महत्त्वाचे…

मुंबई – शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. ते मुंबईत बोलत होते.

राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या दूध अनुदानबाबत मंत्री विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे एका बैठकीत आढावा घेतला या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता संबधित यंत्रणेने घ्यावी, अशसूचना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यास मिळण्यासाठी त्यांच्या जनावरांचे टॅगींग होणे महत्त्वाचे आहे. पशुधनाचे टॅगींग व्हावे, यासाठीचे काम अचूकरित्या पूर्ण केल्यास सर्वांना अनुदानाचा लाभ मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, आयुक्त प्रशांत मोहड, सहा निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध जिल्ह्यातील अधिकारी सहभागी झाले होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.