समाजाची छाया जनतेसमोर आणण्याची काम वृत्तपत्र छायाचित्रकार करतात. – शाहू महाराज

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर प्रेस क्लब, प्रेस फोटोग्राफरच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन साजरा…

कोल्हापूर – वृत्तपत्रातील छायाचित्रकार समाजात घडणाऱ्या सत्य घटना जनतेसमोर मांडतात. छायाचित्राला कोणताही धर्म जात भाषा नसते. समाजाची छाया जनतेसमोर आणण्याची काम वृत्तपत्र छायाचित्रकार करतात, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर यांच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शाहू स्मारक मध्ये आयोजित जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्कार आणि अवतीभवती छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभवेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हे छायाचित्रांचे प्रदर्शन 26 ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहील.

यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील तथा राजा उपळेकर यांना श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्राद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, छायाचित्रकार एका क्षणाच्या फोटोसाठी धडपडत असतो. हा क्षण टिपण्यासाठी सुखदुःख बाजूला ठेवून तो कमा करत असतो. लोकशाहीच्या चौथा स्तंभाचा छायाचित्रकार हा कणा आणि समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. प्रेस फोटोग्राफरांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार सतेज पाटील यांनी आलेल्या परिस्थितीचा विचार न करता निव्वळ क्षण टिपण्यासाठी वृत्तपत्र छायाचित्रकारांची धडपड सुरू असते. इतिहास जिवंत ठेवण्याचे काम फोटोग्राफरनी केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेल्या व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, कॅडसन कलर लॅबचे शशिकांत कदम, भारत कलरचे नंदकुमार मोरे व परिवार, श्री महालक्ष्मी अन्नछत्र चे अध्यक्ष राजू मेवेकरी, ऋषभ डेव्हलपर्सचे जयेश ओसवाल, महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण समितीचे माजी अध्यक्ष अमर समर्थ, चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ दिवंगत छायाचित्रकार जॉनी ट्रेनर यांच्या परिवारातर्फे जस्मिन मन्सूर अत्तार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारासाठी रोख रक्कम पाच हजार रुपये दिली. तसेच उद्योजक जयेश ओसवाल यांनी या पुरस्कारासाठी दरवर्षी दहा हजाराची रक्कम जीवन गोरव निधी म्हणून दिली जाईल अशी ग्वाही दिली. मानपत्राचे वाचन बी. डी. चेचर यांनी केले.

ज्येष्ठ छायाचित्रकार रघु जाधव, प्रॉडक्ट अँड इंडस्ट्रियल छायाचित्रकार संजय चौगुले, वेडिंग छायाचित्रकार ऋषिकेश भांबुरे, सिनेमॅटिक छायाचित्रकार शुभम चेचर यांनी युवा छायाचित्रकारांना फोटोकॉपी क्षेत्रातील माहिती विषयक मार्गदर्शन केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे,संचालक आदित्य वेल्हाळ, पत्रकार समीर देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, गोकुळचे विश्वास पाटील, बाबा जांभळे, बाबा इंदुलकर, आदींसह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, जुने नवे छायाचित्रकार, प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी पत्रकार, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.