नॅशनल पॉवर लिफटींगमध्ये जिज्ञासाचा उत्कर्ष सुवर्णपदक विजेता

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

१२ स्पर्धकांना मागे टाकत ८३ किलो वजनी गटात ४१७.५० किलो वजन उचलले

कोल्हापूर : जिज्ञासा विशेष शिक्षण व अपंगमति विकास संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या कु. उत्कर्ष उत्तम चव्हाण याने नॅशनल पॉवर लिफटींग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले.

दिल्ली येथे 23 ते 26 सप्टेंबरदरम्यान झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक्स नॅशनल पॉवर लिफटींग चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राच्या संघातून खेळताना उत्कर्षने 83 किलो गटात स्कॉट – 160 किलो, डेड लिफ्ट – 165 किलो आणि बेंच प्रेस – 92.5 किलो असे एकूण 417.50 किलो वजन उचलत 12 स्पर्धकांमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली.

उत्कर्षची कामगिरी अशी

  • स्पर्धा ठिकाण : दिल्ली
  • कालावधी : 23 ते 26 सप्टेंबर 2025
  • वजनी गट : 83 किलो
  • स्कॉट : 160 किलो
  • डेड लिफ्ट : 165 किलो
  • बेंच प्रेस : 92.5 किलो
  • एकूण वजन : 417.50 किलो
  • स्पर्धक : 12
  • यश : सुवर्ण पदक

ही स्पर्धा 2027 मध्ये दक्षिण अमेरिकेतील चिली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणी म्हणून घेण्यात आली होती. देशभरातील 21 राज्यांमधून 143 खेळाडू यात सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उदघाटन दिल्लीचे गृहमंत्री व शिक्षण मंत्री श्री. आशिष सूद यांच्या हस्ते झाले तर बक्षीस वितरण खासदार सौ. बासुरी स्वराज यांच्या हस्ते झाले.

उत्कर्षच्या तयारी आणि दमदार खेळीबद्दल स्पेशल ऑलिम्पिक्सच्या श्रीमती एकता मॅडम, श्री. हरप्रीत सिंह (दिल्ली), श्री. राजशेखर (आंध्र प्रदेश) यांनी विशेष कौतुक केले. त्याच्या यशामागे प्रशिक्षक श्री. मुबारक एकसंबेकर व वडील श्री. उत्तम चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्पेशल ऑलिम्पिक्स कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. स्मिता दिक्षित यांचे प्रोत्साहनही मिळाले.

स्पे. ऑलिम्पिक्स महाराष्ट्रच्या अध्यक्षा सौ. मेधा किरीट सोमय्या, एरिया डायरेक्टर श्री. भगवान तलवारे, स्पोर्टस डायरेक्टर श्री. जितेंद्र ढोले यांनी फोन करून उत्कर्षचे अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.